Video : इमरान हाश्मीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!

इमरान हाश्मीने भारतातील सर्वात महागडी मानली जाणारी कार खरेदी केली आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.  

Updated: Jan 11, 2024, 07:46 PM IST
 Video : इमरान हाश्मीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्! title=

Emraan Hashmi New Car : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा इमरान हा चित्रपटातील त्याच्या किसींग सीनमुळे कायमच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटातील किसिंग व रोमँटिक सीन्सची सतत चर्चा रंगताना दिसते. आता इमरान हाश्मीने नवीन 'कार'नामा केला आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

इमरान हाश्मी हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो पोस्ट करताना दिसतो. आता नुकतंच इमरान हाश्मीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. त्याने नुकतंच एक नवी अलिशान कार खरेदी केली आहे. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत इमरान हा नव्या कारमध्ये बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तो पापाराझींना कारमध्ये बसून हात दाखवताना दिसत आहे. 

भारतातील सर्वात महागडी कार, जाणून घ्या किंमत?

इमरान हाश्मीने भारतातील सर्वात महागडी मानली जाणारी रोल्स रॉयस ही अलिशान कार खरेदी केली आहे. इमरान हाश्मीने काळ्या रंगाची कार खरेदी केली आहे. इमरान हाश्मीच्या या नवीन कारची किंमत 12.25 कोटी रुपये आहे. त्याच्या या गाडीची झलकही समोर आली आहे. 

पाहा व्हिडीओ :

इमरान हाश्मी आहे कारचा शौकीन

इमरान हाश्मीकडे अनेक कार आहेत. तो कारचा प्रचंड शौकीन आहे. रोल्स रॉयस ही कार खरेदी करण्यापूर्वी त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. इमरान हाश्मीकडे लॅम्बोर्गिनीच्या दोन कार आहेत. यात लॅम्बोर्गिनी हुराकन, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो हे मॉडेलच्या कार आहेत. त्याबरोबरच रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज मेबॅक एस560, ऑडी ए8 एल यासारख्या महागड्या कार आहेत.

इमरान हाश्मी हा ‘मर्डर’, ‘मर्डर२’, ‘राज ३’, ‘गँगस्टर’, ‘झहर’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो शेवटचा टायगर 3 या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता लवकरच तो डॉन 3 या चित्रपटात झळकणार आहे. त्यात तो रणवीर सिंगसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.