खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं खास मित्र फरहान अख्तर याच्या लग्नाला हजेरी लावली. तिथे फरहानच्या लग्नात धमाल केल्यानंतर या अभिनेत्यानं कुटुंबालाही तितकाच वेळही दिला. मुख्य म्हणजे हृतिकसोबत इथं त्याच्या कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्रीही पाहता आली. (Hritik Roshan saba azad)

ही खास व्यक्ती होती, त्याची कथित प्रेयसी सबा आझाद. अद्यापही सबा आणि हृतिकनं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

किंबहुना ही घोषणाच आता प्रतिक्षेत आहे. पण, त्याआधीच त्याच्या कुटुंबात एका खास व्यक्तीनं प्रवेश केला आहे. सबाच्या येण्यानं हृतिकच्या कुटुंबातही सध्या आनंदाचं वातावरण पाहता येत आहे. 

हृतिकचे काका, राजेश रोशन यांनी इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत असताना, त्यांनी हे क्षण शब्दांत मांडण्याचा प्रयत्नही केला. 

'आनंद हा आजुबाजूलाच असतो. विशेषत: रविवारच्या दिवशी... त्यातही दुपारच्या जेवणाच्या वेळी खरी मजा... ', असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला लिहिलं. 

सबा आणि हृतिकच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच तिचं त्याच्या कुटुंबासोबत अगदी सहज वावरणं खूप काही सांगून जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saba Azad (@sabazad)

दरम्यान, सबाचं नाव हृतिकशी जोडलं जाण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या मुलाशी म्हणजेच इमाद शाह याच्याशी जोडलं गेलं होतं. 

इमाद आणि सबा बरीच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांत्या नात्यात अखेर दुरावा आला. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Bollywood Actor Hrithik Roshans rumoured GF Saba Azad enjoys Sunday lunch with family
News Source: 
Home Title: 

खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री

 

खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री
Caption: 
छाया सौजन्य- सोशल मीडिया
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
खास मित्राचं लग्न होत असताना, हृतिकच्या घरात 'तिची' एन्ट्री
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, February 21, 2022 - 10:40
Created By: 
Sayali Patil
Updated By: 
Sayali Patil
Published By: 
Sayali Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No