मुंबई : बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचं राजकारण काही नवी बाब नाही. मुद्दा असा, की ही घराणेशाही करतं कोण आणि याला बळी पडतं कोण. कोणी म्हणतं अभिनेता सुशांत सिंह राजपूतलाही घराणेशाहीमुळं पुढं बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता.
कोणी म्हणतं प्रस्थापितांकडून इथं कोणताही वरदहस्त नसणाऱ्या कलाकारांना बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. सध्या अशाच कार्तीरत सापडला आहे अभिनेता कार्तिक आर्यन. (Bollywood Actor)
काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती जिथं अभिनेता कार्तिक आर्यन याला बॉलिवूडमधीच काही मंडळी त्रास , मानसिक त्रास देत असल्याचं म्हटलं गेलं.
2021 मध्ये बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ज्यानंतर आता एका कार्यक्रमादरम्यान तुझ्यावर निशाणा साधला जात आहे का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
एकिकडे हा कोणतं टोकाचं पाऊल उचलणार नाही ना... असं वाटत असतानाच दुसरीकडे कार्तिकनं या प्रकरणावर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
'मी हे सर्व वाचतही नाही. मुळात असं काही नाहीये... मला कोणामुळेही चिंता वाटत नाही. हे पाहा... मी एक पुरस्कार घेऊन जातेय... ', एका पुरस्कार सोहळ्यामध्ये आल्यानंतर त्यानं केलेलं हे वक्तव्य तो नेमकं खरं बोलतोय ना की कोणत्या दडपणामुळे बोलणं टाळतोय हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
कार्तिक सध्या 'कॅप्टन इंडिया', 'भूल भुलैय्या 2', 'शहजादा' या चित्रपटांसाठी काम करत आहे. येत्या काळात तो या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.