Tattoo काढत कुणाल खेमू म्हणतो, 'ती' माझ्या हृदयाच्या कायम जवळ असेल...

ती कोण कळलं का?   

Updated: Oct 8, 2020, 05:15 PM IST
Tattoo काढत कुणाल खेमू म्हणतो, 'ती' माझ्या हृदयाच्या कायम जवळ असेल...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबाबत चाहत्यांना कायमच कुतूहल असतं. म्हणजे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीनं नवी काही गोष्ट केली, की त्याचं अनुकरण हमखास अनेक चाहत्यांकडून केलं जातं. सध्या अनेक चाहत्यांच्या मते असंच अनुकरणीय काम केलं आहे अभिनेता कुणाल खेमू यानं. 

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या कुणालच्या एका पोस्टवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोहा अली खान हिच्या पतीनं म्हणजेच कुणाल खेमू यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. 

पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कुणाल त्याचा नवा टॅट्टू दाखवताना दिसत आहे. बरं हा टॅट्टू फक्त म्हणण्यापुरताच नव्हे, तर शब्दश: त्याच्या हृदयाच्या जवळ आहे. कारण, हे नाव आहे त्याच्या मुलीचं. इनाया नौमीचं. 
आपल्या या नव्या टॅट्टूचा फोटो पोस्ट करत कुणालनं लिहिलं, 'ही शाई (टॅट्टू) भावनिक आणि शाब्दिकरित्या माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. माझी मुलगी ही कायमच माझाच अंश असेल. (या टॅट्टूमध्ये) तिचं नाव, इनाया मध्यभागी देवनागरीमध्ये लिहिण्यात आलं आहे. तिचं मधलं नाव, नौमी म्हणजेच दुर्गा माँ, हे लाल रंगाच्या ठिपक्याच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. आणि दोन्ही बाजूंना त्रिशूळ आहे'. 

 

अतिशय सोप्या शब्दांत कुणालनं त्याच्या या टॅट्टूचा अर्थ आणि त्याचं त्याच्या जीवनातील स्थान सर्वांपुढे ठेवलं. ज्यानंतर अनेकांनीच कुणालची प्रशंसा केली. वडील म्हणून मुलीला कायमच आपल्यासोबत ठेवण्याचा त्याचा हा अंदाज अनेकांना भावला.