हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Updated: Jul 15, 2017, 06:16 PM IST
हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

गेल्या काही दिवसांपासून सतत उद्भवणाऱ्या गंभीर डोकेदुखीच्या कारणानं त्याला रुग्णालय गाठावं लागलंय. 

परंतु, आपल्या फॅन्सला दिलासा देत मनोज वाजपेयीनं आपण ठिकठाक असल्याचं सांगत दिलासा दिलाय. मनोजनं एक लिखित संदेश आपल्या चाहत्यांसाठी धाडलाय. 'मी 'अय्यारी'च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. मला गंभीर डोकेदुखी जाणवत होती आणि ती ठिक होण्याचं नाव घेत नव्हती. म्हणून एखादा गंभीर आजार तर जडलेला नाही ना? अशी शंका होती. परंतु, हॉस्पीटलमध्ये सगळी तपासणी झाल्यानंतर सर्व काही ठीक आहे. कामावर परतलोय... धन्यवाद' असं मनोजनं आपल्या संदेशात म्हटलमय. 

'अय्यारी' या सिनेमात मनोजसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि नसीरुद्दीन शाह यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात सिद्धार्थ सेनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.