'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर

सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला असून तिचा हॉस्पिटलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 30, 2025, 02:34 PM IST
'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर title=

Shweta Rohira accident : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला आहे. या अपघाताविषयी स्वत: श्वेता रोहिराने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून माहिती अपघाताची माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिची अवस्था खूपच भयानक झालेली दिसत आहे. या फोटोमध्ये श्वेता रोहिरा बेडवर पडलेली दिसत आहे. ज्यामध्ये तिच्या ओठाला पट्टी लावल्याचे दिसत आहे. तर तिच्या प्लास्टर केल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा ओठ फाटल्याचं दिसत आहे. 

श्वेता रोहिरा ही सलमान खानची मानलेली बहीण आहे. ही अभिनेता पुलकित सम्राट याची पहिली पत्नी होती. सध्या तिच्या अपघाताच्या फोटोंनी एकच गोंधळ उडाला आहे. 

श्वेता रोहिराने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आयुष्य आश्चर्यांनी भरलेले असते, नाही का? एका क्षणी, तुम्ही कल हो ना हो हे गाणं गुणगुणत असता आणि तुमच्या दिवसाचे नियोजन करत असता. दुसऱ्या क्षणी, आयुष्य म्हणते की चहा धरा मी तुझ्यासाठी बाईक पाठवतो. माझी कोणतीही चूक नसताना, मी चालण्याऐवजी उडत असते.  दुर्दैवाने बॉलिवूडच्या मंद गतीच्या चित्रपटांसारखे नाही आणि थेट जबरदस्तीने विश्रांती घेण्याच्या स्थितीत पोहोचतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

फ्रॅक्चर झालेली हाडे, जखम आणि अंथरुणावर खूप वेळ घालवणं. हे माझ्या कामाच्या यादीत नव्हते. पण कदाचित देवाला वाटले असेल की मला संयमाचा धडा हवा आहे किंवा मला माझ्या स्वतःच्या मिनी-सोप ऑपेरामध्ये काम करायचं असेल. ज्यामध्ये हॉस्पिटल ड्रामा देखील समाविष्ट असेल. सत्य हे आहे की, कधीकधी जीवन आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला मजबूत करण्यासाठी हादरवते. शेवटी, विनाश नवीन बांधकामाचा मार्ग मोकळा करतो. जरी ते खूप वेदनादायक असले तरी. मला माहित आहे की हा फक्त एक अध्याय आहे, संपूर्ण कथा नाही.

पुलकित याची पहिली पत्नी आहे श्वेता रोहिरा

अभिनेता पुलकित याची पहिली पत्नी श्वेता रोहिरा आहे. पुलकितसोबत चार वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यानंतर 'सनम रे' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री यामी गौतम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर श्वेताने पुलकितने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x