मुंबई: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांच्याहगी नात्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता सर्वत्र त्यांच्याच लग्नाविषयीच्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. 'दीप-वीर' म्हणून संपूर्ण कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या या जोडीने जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अत्यंत खासगी अशा विवाहसोहळ्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळत असून, १४ आणि १५ नोव्हेंबरदरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत.
मुख्य म्हणजे मोजक्याच मंडळींच्या उपस्थिती दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बेडीत अडकणार असून, सातासमुद्रापार इटलीत हा सोहळा रंगणार आहे.
लग्नविधी पार पडल्यानंतर आपल्या मित्र परिवारासाठी म्हणून रणवीर आणि दीपिकाने एका खास पार्टीचं आयोजनही केलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लग्नविधी पार पाडून भारतात परतल्यानंतर १ डिसेंबरला दीपिका आणि रणवीर स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्याचा बेत आखल्याचं कळत आहे.
रिसेप्सनसाठी मुंबईतील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलची निवड करण्यात आल्याचं कळत असून, या दिवशी दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांसह संपूर्ण कलाविश्वाची उपस्थिती पाहता येणार आहे.
१ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी फक्त कलाविश्वातीलच नव्हे तर, विविध क्षेत्रातील त्यांच्या मित्रपरिवाराचीही उपस्थिती असणार आहे.
तेव्हा आता बधाई हो! असं म्हणत या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी कोण कोण पोहोचणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.