close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'अंदाज अपना अपना २'मध्ये आमिर- सलमानच्या भूमिकेसाठी 'यांची' वर्णी

काही चित्रपट हे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षे उलटूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात

Updated: Aug 25, 2019, 11:08 AM IST
'अंदाज अपना अपना २'मध्ये आमिर- सलमानच्या भूमिकेसाठी 'यांची' वर्णी

मुंबई : काही चित्रपट हे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षे उलटूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'अंदाज अपना अपना'. नोव्हेंबर १९९४ला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट अनेकांसाठी मनोरंजनाचा समानार्थी शब्द, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटातून आमिर खान, सलमान खान यांच्या अफलातून आणि तितक्याच विनोदी अंदाजातील अभिनाची झलक पाहता आली होती. रवीना टंडन, करिष्मा कपूर, परेश रावल यांच्याही भूमिका चित्रपटातून पाहता आल्या होत्या. अशा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अंदाज अपना अपनाच्या दुसऱ्या भागाच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. पण 'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा सलमान आणि आमिरची जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यावेळी हे दोघंही नव्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दिलीप शुक्ला सध्या या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आमिर आणि सलमानशिवाय हा चित्रपट अपूर्णच राहील. 

'अंदाज अपना अपना 2' में फिर एक बार साथ नजर आएंगे सलमान और आमिर खान?

'प्रेम' आणि 'अमर' या दोन पात्रांना रुपेरी पडद्यावर अतिशय प्रभावीपणे सादर करणाऱ्या सलमान आणि आमिरचा नेमका कोणता अंदाज या चित्रपटातून पाहता येणार हे जाणून घेण्यासाठीच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. शिवाय आमिर आणि सलमानसोबत या चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यासाठी कोणाची वर्णी लागणार याविषयीचं कुतूहलही पाहायला मिळत आहे.