Salman Khan : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, एकच खळबळ

बॉलिवूडमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Updated: Jun 5, 2022, 07:50 PM IST
Salman Khan : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, एकच खळबळ title=

राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : बॉलिवूडमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू  मुसेवालाप्रमाणेच जीवे मारण्याची धमकी सलमान खानला मिळाली आहे.  त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे. (bollywood actor salman khan has received threat)

नक्की काय झालं? 

सलमानचे वडील सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे त्यांना बेंचवर सलमानच्या नावे असलेलं धमकीचं पत्र मिळालं. या पत्रात सलमानला सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारण्यात येणार असल्याचं म्हटलंय. सलीम खान यांना सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान हे पत्र मिळाल्याचं समजतंय.

गुन्हा दाखल, चौकशी सुरु

या धमकीनंतर वांद्रे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात कलम 506 (2) भादविनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक चौकशी करत आहेत.

मुसेवाला हत्याकांडनंतर सुरक्षेत वाढ

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली होती. या हत्याकांडानंतर सलमानच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.