close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'स्वागत तो करो हमारा...' बहुप्रतिक्षित 'दबंग ३'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

चुलबूल दबंग..दबंग..

Updated: Oct 23, 2019, 07:47 PM IST
'स्वागत तो करो हमारा...' बहुप्रतिक्षित 'दबंग ३'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरमधून पुन्हा एकदा सलमानची दमदार दबंगगिरी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या ३ मिनिटं २२ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये चुलबूल पांडेच्या मस्तीसोबतच, अॅक्शन आणि थ्रिलरही पाहायला मिळत आहे.

'दबंग ३' मधून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने चित्रपटविश्वात पदार्पण केलं आहे. ट्रेलरमधील काही सीन्समध्ये सलमान आणि सईची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. गेल्या दोन चित्रपटांप्रमाणेच 'दबंग ३'मध्येही सलमानसोबत रज्जो अर्थात सोनाक्षी सिन्हाची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. 

चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. रोमान्स, अॅक्शन, डान्स, म्यूझिकसह चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दबंग ३'च्या ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  

येत्या २० डिसेंबर रोजी 'दबंग ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंगही करता येणार आहे. त्यामुळे 'दबंग' 'दबंग २'प्रमाणेच 'दबंग ३'लाही प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.