मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित 'दबंग ३' (Dabangg 3) २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता होती. 'दबंग ३'च्या प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसतेय. 'बॉक्स ऑफिस इंडिया'ने दिलेल्या माहितीनुसार, 'दबंग ३'ने ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर जवळपास ३० कोटींहून अधिक कमाई केल्याची माहिती मिळत आहे.
गुरुवारी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 'दबंग ३'ने जवळपास ११.५० कोटींचा गल्ला जमवला होता. प्रभु देवा दिग्दर्शित 'दबंग ३'मध्ये सलमान खानशिवाय सोनाक्षी सिन्हा, डिंपल कपाडिया, सई मांजरेकर, अरबाज खान आणि सुदीप किच्चा प्रमुख भूमिका साकारत आहेत.
जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सईने सलमानच्या प्रेयसीच्या भूमिका साकारली आहे.
प्रदर्शनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी संध्याकाळी 'बॉयकॉट दबंग ३' (Boycott Dabangg 3)ट्विटरवर ट्रेंड होत होता. 'दबंग 3' सिनेमातील 'हुड हुड दबंग...' सिनेमातील गाण्याला कडाडून विरोध होत होता. या सिनेमातील गाण्यात साधू संतांना गिटार पकडून डान्स करताना दाखवण्यात आलं होतं. काही लोकांनी गाण्यातील या दृष्याला विरोध केला होता. ज्यामुळे 'बॉयकॉट 3' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. अधिकृत केलेल्या घोषणेत ही दृश्ये काढण्यात आल्याच सांगण्यात आलं आहे.