३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सलमानला घ्यावा लागला 'हा' निर्णय़

हा निर्णय होता ....

Updated: Sep 25, 2020, 12:31 PM IST
३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सलमानला घ्यावा लागला 'हा' निर्णय़
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सलमान खान salman khan हा गेली तीन दशकं म्हणजेच जवळपास ३० वर्षांपासून हिंदी चित्रपट वर्तुळात आपल्या कलेच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. पण, आतापर्यंतच्या या कारकिर्दीत पहिल्यांदाच सलमानला नाईलाजानं असा निर्णय घ्यावा लागला ज्यासाठी त्याच्यापुढं होणताही पर्यायच उरला नव्हता. हा निर्णय होता कारकिर्दीत प्रदीर्घ कालावधीसाठी घेतलेली विश्रांती. 

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोना व्हायरसचं वाढतं थैमान पाहता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं हा निर्णय त्याला घ्यावा लागला. कारकिर्दीत ही अशी विश्रांती त्यानं कधीच घेतलेली नव्हती. 'बिग बॉस १४' या रिऍलिटी शोच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये त्यानं याबाबतचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. ३ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित आणि वादग्रस्त धाटणीच्या रिऍलिटी शोला सुरुवात होणार आहे. 

नाईलाजास्तव सुट्टी घ्यावी लागली आणि.... 

मागील सहा महिन्यांपासून काम न करणं माझ्यासाठी नैराश्य आणणारं होतं. मागील तीस वर्षांमध्ये मी कधीच इतक्या मोठ्या सुट्टीवर गेलो नव्हतो. पण, नाईलाजानं मला सुट्टी घ्यावी लागली होती, असं सलमाननं सांगितलं. येत्या वर्षअखेरीस सलमान रितसर सुट्टी घेण्याच्या बेतात होता. पण, आता मात्र या रिऍलिटी शोमुळं त्याला या आखणीतही बदल करावे लागणार आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात कुठं होता सलमान?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सलमान त्याच्या कुटुंबातील काही सदल्यांसह पनवेल येथे असणाऱ्या त्याच्या फार्महाऊसवर गेला होता. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यानं हा निर्णय घेतला होता.  फार्महाऊसवरुन त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी असणारं ऩातं अतिशय वेगळ्या पद्धतीनं जपलं होतं. गरजुंना मदत करण्यापासून ते अगदी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करेपर्यंतची आवाहनं तो चाहत्यांना करताना दिसला. 

 

यंदा मानधनाचा आकडा कमी 

'बिग बॉस'च्या नव्या पर्वासाठी आपण यंदाच्या वर्षी कमी मानधन आकारलं असल्याचं सलमाननं स्पष्ट केलं. कोविड १९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाहिनीवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये यासाठीच त्यानं हा निर्णय़ घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं यंदा कार्यक्रमाच्या सुत्रसंचालासाठी सलमान कमी मानधन घेणार हे स्पष्ट होत आहे. कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येक सदस्याला, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य ते मानधन मिळालं यासाठीच त्यानं हे पाऊल उचलल्याचं कळत आहे.