shahid kapoor mira rajput : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची ओळख हिंदी कलाविश्वातील एक Most Happening Couple म्हणून केली जाते. कोणत्या न कोणत्या कारणामुळं त्याची चर्चा होतच असते. सेलिब्रिटी वर्तुळाशी फारसा संपर्क नसतानाही मीरानं स्वत:ला या जगताशी जितकं एकरुप केलं आहे ते पाहून अनेकांनाच हेवाही वाटतो.
किंबहुना या जोडीमध्ये असणारं प्रेम आणि एकमेकांवर असणारा विश्वास अनेकांसाठीच आदर्श. पण, तुम्हाला माहितीये का या जोडीमध्ये दररोज रात्री वाद होतोय.
असं म्हणतात ना दिसतं तसं नसतं... तसंच काहीसं इथे पाहायला मिळतंय. कारण, शाहिद आणि त्याची पत्नी मीरा एकाच कारणावरून दररोज भांडतात. हे कारण तसं अनपेक्षितच. (shahid kapoor fights every night with wife mira rajput)
बी- टाऊनच्या या जोडीमध्ये वादाची ठिणगी पडण्यात कारणीभूत ठरतो तो म्हणजे पंखा. पंख्याच्या वेगामुळे ते दोघंही रोज रात्री भांडतात. 'कॉफी विद करण' सीजन 7 (koffe with karan 7) मध्ये खुद्द शाहिदनंच ही बाब सांगितली.
अर्थात हे भांडण काही गंभीर स्वरुपाचं नसतं. मीराला शाहिदच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. तिच्या येण्यामुळं जगण्याचा समतोल राखला जात आहे, तिच्या येण्यानं आपल्या आयुष्यात बरंच काही आलंय असं म्हणताना मीरा आपल्याला सातत्यानं सर्वसामान्य असण्याची जाणीव करुन देते अशा गोड शब्दांत त्यानं कार्यक्रमात तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.