मुंबई : आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput याच्या आत्मह्त्येनं suicide सर्वांच्याच मनाला चटका लागला. सुशांतच्या मानसिक स्थितीपासून त्याला नेमकी अशी कोणत्या गोष्टीची भीती सतावत होती की इतक्या मोठ्या निर्णयापर्यंत त्याला पोहोचावं लागलं असेच प्रश्न त्याला जाणणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करु लागले.
सुशांत्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या घडीला त्याच्या आठवणींव्यतिरिक्त आणखी काहीही मागे उरलेलं नाही. अशातच एक अभिनेता म्हणून ज्याप्रमाणं त्याची आठवण काढली जात आहे, तसंच परखडपणे आपली मतं मांडणारा एक दिलखुलास व्यक्ती म्हणूनही सुशांत अनेकांच्या स्मरणात आहे. याचीच प्रचिती येत आहे त्याच्या काही ट्विट आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन.
कलाविश्वात आपल्यावर कोणाचाही वरदहस्त नसल्याचं जाणत असणाऱ्या सुशांतला या झगमगणाऱ्या दुनियेतून आपल्याला दूर फेकूनही दिलं जाऊ शकतं अशी धास्ती एकेकाळी सतावत होती. त्याचं ट्विट पाहता हे लक्षात येतं. अर्थात एका चाहतीच्या ट्विटला उत्तर देत त्यानं ही प्रतिक्रिया दिली असली तरीही, त्या ट्विटमध्ये तो नकळतपणे नेमकी गोष्ट बोलून गेला होता.
वाचा : माझ्या वडीलांची काळजी घ्या, ३ दिवसाआधी सुशांतचे फोनवर संभाषण
फार आधी, एका चित्रपटाशी निगडीत ट्विट करत सुशांतच्या एका चाहतीने म्हटलेलं, 'अरेsss या चित्रपटात तर तुझं पात्र मृत्यूमुखी पडत आहे का? मी चित्रपटगृहात हे दृश्य पाहू शकत नाही. कलाविश्वात तूच खरा मोठ्या मनाचा अभिनेता आहेस. तुझ्यासारख्यांना तर उदंड आयुष्य लाभो....'
तिच्या या ट्विटला उत्तर देत सुशांतनं लिहिलेलं, 'अगं.... तुम्ही असं केलं तर मला ते बॉलिवूडमधून बाहेर फेकतील. माझा कोणी गॉडफादर नाही. माझ्यावर कोणाचा वरदहस्त नाही. तुम्हीच सारे माझे गॉडफादर आहात. इच्छा असेल तर कृपा करुन चित्रपट पाहा. तरच मी कलाविश्वात तग धरु शकेन. तुम्हाला खूप सारं प्रेम....'
वाचा : सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे १२ तास आणि 'ते' ४ फोन क़ॉल
If you can't feel the pain, please F~ck off. #SushantSinghRajput #Nepotism #KaranJohar pic.twitter.com/4vwTAqeBoX
— sakshi° (@sakshi2460) June 15, 2020
नेपोटीझम अर्थात घराणेशाहीबाबत सुशांत काय म्हणाला होता?
कलाविश्वात असणाऱ्या घराणेशाहीबाबत सुशांतनं त्याचं ठाम मतही मांडलं होतं. 'घराणेशाही सर्वत्रच आहे. सर्वत्रच आहे. त्याचं आपण काही करु शकत नाही. नेपोटीझमच्या अस्तित्वाबाबत काही करता येऊ शकत नाही. पण, त्याचवेळी योग्य अशा कौशल्यवान व्यक्तींना पुढे येण्याची संधी मिळत नाही किंवा तुमच्याकडून ती दिली जात नाही तेव्हा मात्र इथे मोठी अडचण आहे. तेव्हा कलाविश्वाचा हा सारा डोलाराच कोसळू शकतो', असं सुशांत म्हणाला होता.