मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी म्हणून बिहार पोलिसांनी थेट मुंबई गाठली. ज्यामध्ये त्याची बहीण मितू सिंह हिचासुद्धा जबाब नोंदवण्यात आला. ज्याअंतर्गत मितूनं काही धक्कादायक माहिती पोसिलांना दिल्याचं कळत आहे.
मितूनं सांगितल्यानुसार सुशांतच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीनं सांगितल्यानुसार रिया जादूटोणाही करत होती. हे सारं काही महिन्यांपूर्वी घडत होतं अशी माहिती यातून समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार याच व्यक्तीनं सुशांतनं आत्महत्या केल्याचं याच व्यक्तीच्या लक्षात आलं होतं.
दरम्यान, गेल्या काही काळापासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पण, आता मात्र बिहार पोलिसांनी याप्रकरणी नव्यानं आणि वेगळा तपास सुरु केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रियाविरोधात पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रियासोबतच आणखी पाच जणांच्या नावेसुद्धा एफआयआर दाखल करण्यात आली होती, ज्यानंतर या प्रकरणीच्या घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला.
एकिकडे रियाच्या अडचणींमध्ये वाढ होत असतानाच आता दुसरीकडे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनंसुद्धा तिच्याबाबती खळबळजनक माहिती पोलिसांना दिली होती. आपल्या पदार्पणाच्याच चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून सुशांतनं आपल्याला मेसेज केल्याचं अंकितानं पोलिसांना सांगितलं होतं. त्यावेळी तो बराच भावनिक झाला होता, असंही ती म्हणाली. आपण या नात्यात आनंदी नसल्याचं म्हणत रिया आपला छळ करत असल्यामुळं या नात्यातून बाहेर पडण्याबाबत तो बोलला होता असंही अंकितानं सांगितलं.