रोनाल्डो, मेस्सीलाही लाजवेल असा Tiger Shroff चा गोल, VIDEO एकदा पाहाचं

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग टायगर श्रॉफ स्टंट,लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Updated: Jun 23, 2022, 05:40 PM IST
  रोनाल्डो, मेस्सीलाही लाजवेल असा Tiger Shroff चा गोल, VIDEO एकदा पाहाचं  title=

मुंबई : बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग टायगर श्रॉफ स्टंट,लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. फिटनेस आणि स्टंटचे त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता त्याचा फुटबॉलच्या मैदानातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतला त्य़ाचा गोल भल्या-भल्या खेळाडूंचे डोळे उघडेच ठेवतोय. त्यामुळे या व्हिडिओची एकचं चर्चा रंगली आहे,

 टायगर श्रॉफला फिटनेस, स्टंट सोबत मैदानावर खेळायलाही आवडते. नुकताच टायगर श्रॉफने त्याच्या अधिकृत कू हँडलवर फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ फुटबॉल खेळताना दिसत आहे. सोबतच या सामन्यादरम्यान टायगर श्रॉफने एक गोलसुद्धा केला. 

Koo App
Dancin with the boyz at #allstarsfcpfh 

- Tiger Shroff (@iTIGERSHROFF) 13 June 2022

टायगर श्रॉफला फुटबॉल खेळताना पाहून तुम्हाला दिग्गज फुटबॉलपटूंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.तसेच व्हिडिओतला त्याचा गोल पाहून नेटकरी त्याची तुलना थेट प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी करत आहेत. टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. 

टायगर मार्शल आर्ट देखील शिकलाय.अनेक सिनेमांमध्ये या आर्ट संबंधित स्टंट करताना त्याला पाहिले गेले आहे. तर आता कु अॅपवर देखील टायगरने असाच एक व्हिडिओ पोस्ट केलाय.  

 व्हॉलिबॉल देखील टायगर खेळतो. या संबंधित व्हिडिओ टायगरने कु अॅपवर पोस्ट केलाय.  

ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना यशाची चव खूप लवकर चाखायला मिळते. टायगर श्रॉफ त्यापैकीच एक म्हणता येईल. त्याने भरपूर यश मिळवले पण त्याची नशा डोक्यात मुळीच जाऊ दिली नाही. विशेष म्हणजे तो ड्रग्स आणि इतर सगळ्या मादक पदार्थांपासून दूर राहतो.

 टायगरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटात येण्यापूर्वी त्याने शपथ घेतली होती. कधीही ड्रग्ज घेणार नाही आणि यश मिळाल्यास त्याची नशा कधी स्वतःवर स्वार होऊ देणार नाही. तरुण पिढीसाठी टायगरचे हे विचार खरोखर प्रेरणादायी म्हणता येतील.

टायगर श्रॉफच्या फिल्मी करिअरबाबत बोलायचे, तर नुकताच त्याचा 'हिरोपंती 2' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. आगामी चित्रपट "गणपत" मध्ये टायगर क्रिती सेननसोबत दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल.