अजय देवगनमुळे अभिनेत्रीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न

ती अभिनेत्री म्हणजे....

Updated: Feb 18, 2020, 10:58 AM IST
अजय देवगनमुळे अभिनेत्रीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न title=
अजय देवगन

मुंबई : कोणाही व्यक्तीशी असणारं नातं हे अमुक एका वळणावर आल्यानंतर त्या नात्यात असे प्रसंगही येतात जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते. आता ही परिस्थिती नेमकी कशी हाताळावी हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. सेलिब्रिटी वर्तुळात नात्यामध्ये उदभवणारी ही परिस्थिती अनेकदा काही टोकाच्या भूमिकांना वाव देत असल्याची उदाहरणंही पाहायला मिळाली आहेत. 

सेलिब्रिटीं रिलेशनशिपच्या याच चर्चांमधील एक बहुचर्चित प्रकरण म्हणजे अभिनेता अजय देवगन Ajay Devgan आणि रवीना टंडनचं. असं म्हटलं जातं की, अजय देवगन आणि रवीना टंडन यांच्या नात्याची कलाविश्वात एकेकाळी बरीच चर्चा होती. काजोल आणि अजयच्या नात्यापूर्वी रवीनासोबतचं अजयचं नातं कलाविश्वात लक्ष वेधत होतं. इथे महत्त्वाची बाब ही, की जिथे रवीना अजयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तिथेच अजय मात्र वेगळ्या भूमिकेत होता. 

असं म्हटलं जातं की अजयवरील प्रेमापोटी रवीनाने आतम्हत्येचाही प्रयत्न केला होता. 'दिलवाले' या चित्रपटात्या वेळी रवीना अजयच्या प्रेमात पडली होती. पण, हे नातं सुरुवातीलाच संपलं होतं. कारण, त्याचदरम्यान अजय कोणा दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात होता. ती मुलगी म्हणजे करिष्मा कपूर. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

करिष्मासाठी अजयचं प्रेम पाहून रवीनाला ही बाब सहन झाली नाही. अजयने आपल्याला फसवल्याचा दावाही रवीनाने केल्याचं म्हटलं जातं. पण, तिने हे सारंकाही प्रसिद्धीसाठी केल्याचं अजयने सांगितलं होतं. किंबहुना त्याने रवीनासोबतची मैत्रीही नाकारली होती. नात्यांची ही गुंतागुंत वाढली आणि गोष्टी पाहता पाहता चित्र पूर्णपणे बदललं त्याला नवं वळण मिळालं.