करण जौहरसाठी कँटीनमधून ही अभिनेत्री जेवण चोरायची, शाळेतील दिवसांतली एक तर्फी लव्हस्टोरी

'कुछ कुछ होता है' या सिनेमातील राणी मुखर्जीने साकारलेलं टीना हे कॅरेक्टर करणने 'या' अभिनेत्रीसाठी लिहिलं होतं

Updated: Apr 25, 2021, 10:46 PM IST
करण जौहरसाठी कँटीनमधून ही अभिनेत्री जेवण चोरायची, शाळेतील दिवसांतली एक तर्फी लव्हस्टोरी

मुंबई : ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे बर्‍याचदा चर्चेत असते, मात्र यावेळी पोस्टमुळे नाही तर चर्चा आहे तिच्यावर केलेल्या एकतर्फी प्रेमाची.  चला तर मग जाणून घेवुयात, तिच्या आयुष्यातील जुन्या दिवसांशी संबंधित एक कथा. ही गोष्ट करण जोहरने स्वतः सांगितली होती, करण ट्विंकलचा जुना मित्र आहे. करण एकेकाळी ट्विंकलवर एकतर्फी प्रेम करायचा असं तो म्हणाला होता

लहानपणापासूनच करण आणि ट्विंकल एकाच शाळेत शिकत होते. त्यानंतर ट्विंकल आणि करण चांगले मित्र-मैत्रीण बनले.  ट्विंकल खन्नाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, चित्रपट निर्माता करण जोहर तिला शाळेच्या दिवसांत पसंत करायचा

ट्विंकलने तिच्या ‘मिसेज फनीबोन्स’ या पुस्तकाच्या लाँचिंगवेळी सांगितलं की, करणने माझ्यावर प्रेम कबुली दीली होती. तो माझ्यावर प्रेम करायचा याची. आधी मला अपर लीप्स ला केस होते. हे बधुन मला करण हॉट म्हणायचा. त्याला माझी छोटी मिशी आवडायची बॉलिवूडमधील सर्वात मोठा आणि हिट 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील राणी मुखर्जीने साकारलेलं टीना हे कॅरेक्टर करणने ट्विंकलसाठी लिहिलं होतं. पण ट्विंकल काही कारणास्तव ते करू शकली नाही.

जेव्हा अक्षय 'कॉफी विथ करण' मध्ये आला होता, तेव्हा करणने त्याच्यासमोर म्हटले होते की, त्याला ट्विंकल उर्फ टीना खूप आवडते आणि जर अक्षयने टीनाशी लग्न केलं नसतं तर ही कथा काही वेगळी असू शकली असती.

करणचं नावं जितेंद्रची मुलगी आणि टीव्हीची क्वीन एकता कपूरसोबत जोडलं जात होतं बनली. एकताने बर्‍याच वेळा असंही म्हटले होते की, करणशी लग्न करण्यास तिला काहीच हरकत नाही. एका शोमध्ये करणची खास मैत्रिण फराह खानने स्वत: म्हटले होते की, ती करण आणि एकताच्या लग्नात प्रत्येकाला नृत्य शिकवेल आणि लवकरच दोघांनीही लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. मात्र, हे होऊ शकले नाही मात्र तरीही दोघेही स्वत: ला चांगले मित्र मानतात.