मुंबई : कोरोना Coronavirus विषाणूमुळे सर्वत्र तणावाचं वातावरण असताना यादरम्यान मिळालेला वेळ अनेकांनीच सत्कारणी लावल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळींपर्यंत सर्वांचाच यात समावेश. अशा या वातावरणात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती, विराट कोहलीसुद्धा एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर ही जोडी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या होम क्वारंटाईनधील काही क्षण सर्वांच्या भेटीला आणत आहे. असाच एक व्हिडिओ अनुष्काने नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या पतीची म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याची चक्क खिल्ली उडवाना दिसत आहे.
कोहलीला या काळात मैदानावरील त्या सर्व वातावरणाची आठवण येत असावी म्हणून अनुष्काचा हा सारा खटाटोप. तिने पोस्ट केलेल्या कॅप्शमधून हेच स्पष्ट होत आहे. अनुष्का या व्हिडिओमध्ये मैदानात असणाऱ्या चाहत्यांच्या रुपात दिसत आहे. जे कोहलीची फलंदाजी सुरु असतातना त्याने दमदार फटकेबाजी करत चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवून द्यावा अशीच अपेक्षा बाळगून असतात.
'ए कोहली.... चौका मार ना चौका.. ए कोहली.....', असं म्हणताना अनुष्का दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून विराट काहीतरी अनपेक्षित घडत असल्याप्रमाणेचे भाव चेहऱ्यावर आणत तिच्याकडे पाहून पुन्हा दुर्लक्ष करत आहे. या सेलिब्रिटी जोडीची लॉकडाऊनमधली ही केमिस्ट्री पाहता, अरे ये तो कमाल है.... अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली आहे.