Nora Fatehi ला पाहून चाहते सैरभैर; उत्साहाच्या भरात तिच्यासोबत असं केलं की...

व्हिडीओ विचलित करणारा... 

Updated: Aug 9, 2022, 04:58 PM IST
Nora Fatehi ला पाहून चाहते सैरभैर; उत्साहाच्या भरात तिच्यासोबत असं केलं की...  title=
Bollywood Actress dancer Nora Fatehi airport video fans made her feel uncomfertable

Nora Fatehi Viral Video: फार कमी दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात येणाऱ्या नोरा फतेही हिच्या लोकप्रियतेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. मादक सौंदर्य, निरागस आणि तितकंच लाघवी बोलणं आणि अप्रतिम नृत्यकौशल्याच्या बळावर नोरा प्रसिद्धीझोतात आली. 

रिअॅलिटी शोपासून चित्रपटांपर्यंत नोरानं मजल मारली. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. विमानतळ म्हणा किंवा मग एखाद्या कार्यक्रमाचा सेट, नोरा तिथे आल्यावर जणू तिच्यामागोमाग छायाचित्रकार आणि चाहत्यांची गर्दीही तिथं एकत्र दिसते. 

सहसा नोरा चाहत्यांच्या कलानं घेत कायम त्यांना प्राधान्यस्थानी ठेवते. त्यांच्यासोबत फोटो काढतानाही ती नकार देताना दिसत नाही. पण, व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये मात्र ती याच्या संपूर्ण विरुद्ध वागताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर सध्या नोराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या Video मध्ये ती विमानतळावर जात असतानाच तिथे काही चाहते आले. (Nora Fatehi airport video) तिच्याभोवती गर्दी केली. एका क्षणाला ही मंडळी नोराच्या इतकी जवळ आली की तिलाही तिथे उभं राहण्यास संकोच वाटू लागला, शेवटी तिनं त्या गराड्यातून कसाबसा पळ काढला. .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

नोराला चाहत्यांची कमी नाही. पण, अनेकदा चाहतेसुद्धा सेलिब्रिटींवर प्रेम व्यक्त करताना त्यांच्या मर्यादा विसरुन जातात. सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटीच्या पोस्टवर कमेंट करणं असो किंवा त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीप्पणी करणं असो, अनेकदा चाहतेही त्यांच्या मर्यादा विसरतात ही बाब नाकारता येणार नाही. त्यातही सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींना अशा प्रसंगांना सामोर जावं लागतं याहून वाईट गोष्ट काय?