VIDEO : 'छपाक'मधील दीपिकाचा किसिंग kissing scene व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच चर्चेत आहे. 

Updated: Apr 22, 2019, 06:24 PM IST
VIDEO : 'छपाक'मधील दीपिकाचा किसिंग  kissing scene  व्हायरल  title=

मुंबई : विवध धाटणीच्या भूमिकांना न्याय देणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सध्या नवी दिल्ली येथे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. जेथे दीपिका तिचं पात्र साकारण्यासाठी बरीच मेहनतही घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत. एकिकडे शाळेच्या गणवेशातील दीपिकाचा अनोखा लूक नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत नाही, तोच 'छपाक'च्या सेटवरील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. 

दिल्लीत चित्रीकरण सुरू असणाऱ्या एका ठिकाणचा हा व्हिडिओ असून, एका किसिंग सीनच्या वेळी तो चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कोणाचेच चेहरे स्पष्ट दिसत नाही आहेत. पण, तो 'छपाक'च्याच सेटवरील असल्याचं म्हटलं जात आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आतापर्यंतच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. ज्यामध्ये दीपिका मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. 

लक्ष्मीच्या बायोपिकमध्ये दीपिका 'मालती' नावाचं पात्रं साकारेल. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे तिच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 'छपाक' १० जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. बायोपिक या प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता आता दीपिकाचे हे प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.