अन् तो दिग्दर्शक इरफानला म्हणाला, 'मला चित्रपट बनवू द्या, तुम्ही .....'

फार वेळ न दवडता इरफानने पुन्हा त्याचा मोर्चा कामाकडे वळवला 

Updated: Apr 22, 2019, 04:50 PM IST
अन् तो दिग्दर्शक इरफानला म्हणाला, 'मला चित्रपट बनवू द्या, तुम्ही .....'  title=

मुंबई : साधारण वर्षभर न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराशी लढा दिल्यानंतर अभिनेता इरफान खान भारतात परतला. परदेशात असतानाही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. मायदेशी परतल्यानंतर फार वेळ न दवडता इरफानने पुन्हा त्याचा मोर्चा कामाकडे वळवला आणि 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटासाठी त्याने मेहनत घेण्यात सुरुवात केली. 

'हिंदी मीडियम' या चित्रपटाचा सिक्वल असणाऱ्या अंग्रेजी मीडियमचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. पण, यातच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मात्र 'मला चित्रपट साकारु द्या, तुम्ही ऊस खात राह....' असं थेट इरफानला म्हटलं आहे. आता तो इरफानला असं का म्हणाला हाच प्रश्न चाहत्यांच्याही मनात घर करत आहे. 

चित्रपटाच्या सेटवर सारंकाही आलबेल आहे ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतानाच इथे लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे हे सारंकाही खुद्द इरफाननेच सोशल मीडियावर पोस्ट केलं. तेसुद्धा अगदी विनोदी अंदाजात. पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये इरफान ऊस खाताना दिसत असून, दिग्दर्शक होमी त्याला 'तुम्ही ऊस खा. मला चित्रपट करु दे....' असं म्हणताना दाखवण्यात आलं आहे. 

एका मीमच्या स्वरुपातीला हा फोटो सध्या अनेकांसाठीच चर्चेचा विषय ठरत आहे. इरफानने यापूर्वीही असे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो चित्रपटाच्या सेटवर सर्वांसोबत प्रत्येकक्षणाचा मनमुराद आनंद घेत असल्याचं कळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री राधिका मदान या चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तर, करिना कपूर खान या चित्रपटात इरफानच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याच्याही चर्चा आहेत.