दीपवीरला पाहून 'हे' सेलिब्रिटी म्हणतात, आम्ही लग्नाळू

दीप-वीरने मंगळवारी इतरही बरेच फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. 

Updated: Nov 21, 2018, 09:21 AM IST
दीपवीरला पाहून 'हे' सेलिब्रिटी म्हणतात, आम्ही लग्नाळू

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला काही दिवस उलटल्यानंतर अखेर या नवविवाहित जोडीने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केला. सुरुवातीला लग्नातील फक्त दोनच फोटो शेअर करणाऱ्या दीप-वीरने मंगळवारी इतरही बरेच फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं. 

दोघांनीही एकाच वेळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे सुरेख आणि तितकेच लक्षवेधी फोटो शेअर करत पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. 

फक्त चाहतेच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या या फोटोंकडे एकटक पाहत होते, आनंद व्यक्त करत होते. काहींनी तर फोटोवर कमेंट करत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. 

निर्माता- दिग्दर्शन करण जोहरने दीपिका-रणवीरच्या फोटोंवर कमेंट करत...उफ्फ..... मलाही लग्न करायचं आहे, अशी कमेंट केली. तर सोनाक्षी सिन्हानेही, 'नजर ना लगे बाबा और बेबी को...., बस अब मेरी करा दो', अशी कमेंट केली. 

करण, सोनाक्षी आणि इतरही बी- टाऊन सेलिब्रिटींच्या या फोटोंवर येणाऱ्या कमेंट पाहता सेलिब्रिटीही आम्ही लग्नाळू... म्हणत आहेत, असंच स्पष्ट होतंय. 

लग्नसोहळ्यातील प्रत्येक समारंभाचा आनंद घेत दीपिका आणि रणवीरने काही अविस्मरणीय क्षणांचा साठात आपल्या चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. ज्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.