बॉलिवूडची 'ही' सौंदर्यवती ठरली दशकातील Sexiest Asian Women

Sexiest Asian Women...

Updated: Dec 14, 2019, 04:41 PM IST
बॉलिवूडची 'ही' सौंदर्यवती ठरली दशकातील Sexiest Asian Women  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण  (Deepika Padukone) सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती चर्चेत येण्याचं कारणही तसंच आहे. दीपिका दशकातील म्हणजेच १० वर्षांतील सर्वात Sexiest Asian Women ठरली आहे. 

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला एका ऑनलाईन पोलद्वारा दशकातील सर्वात सेक्सी आशियाई महिला म्हणून घोषित करण्यात आलं आहे. २०१९ हे वर्षच संपत नाही, तर एक दशकही समाप्त होणार आहे. त्यामुळे अनेक प्रमुख प्रकाशन आणि पुरस्कार अशा सेलिब्रिटींची घोषणा करत आहेत ज्यांनी गेल्या १० वर्षात आपल्या शैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत. यूकेमधील विकली ईस्टर्न आयने घोषणा केली आहे की, दीपिकाला एका ऑनलाईन पोलमध्ये दशकातील सर्वात सेक्सी आशियाईचा किताब मिळाला आहे. बुधावारी याबाबत घोषणा करण्यात आली.

दीपिकाचं २०१९ मध्ये केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही तिच्या स्टाईलचं कौतुक केलं गेलं. दीपिकाची मेट गाला आणि दरवर्षी आयोजित होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर तिची चांगलीच चर्चा होती. या दोन्ही इव्हेन्टमध्ये दीपिकाच्या ड्रेसिंगचं, तिच्या स्टाईलचं कौतुक केलं गेलं आहे.

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आलिया भट्ट  २०१९ मधील सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. 

दीपिका सध्या तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' Chhapaak चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण  चित्रपटात लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका साकारत आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर प्रकाशझोत टाकत हा चित्रपट साकारण्यात आला आहे.