सुष्मिताने का मागितली त्यांची माफी?

असं काय झालं की.... 

Updated: Dec 14, 2019, 03:46 PM IST
सुष्मिताने का मागितली त्यांची माफी?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन ही कायमच तिच्या काही निर्णयांसाठी ओळखली जाते. मुली दत्तक घेण्यापासून ते खासगी आयुष्यातील इतरही काही निर्णयांपर्यंत सुष्मिताने कायमच समाजापुढे काही आदर्श ठेवले आहेत. पण, सध्या मात्र बी- टाऊनची ही अभिनेत्री एका गोष्टीसाठी माफी मागण्याच्या बेतात दिसत आहे. सोशल मीडियावरील तिची पोस्टच हे सारंकाही सांगत आहे. 

सुष्मिताने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर रोमन शॉल आणि सुष्मिताची मोठी मुलगी रेने सुरेख गाणं गाताना दिसत आहे. गाणं गात असताना मध्येच ते दोघंही चुकतात. तेव्हा त्या ठिकाणी एकच हशा पिकतो. ते काही खास क्षण सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 

Let me be your hero baby” ABSOLUTELY!!! , असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. शिवाय हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल रेने आणि तुम्ही दोघंही मला क्षमा कराल, असंही तिने म्हटलं आहे. आता या 'दिलबर गर्ल'ला क्षमा मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे म्हणा. पण, तूर्तास तिच्या आयुष्यातील हे खास क्षण नेटकऱ्यांसाठी मात्र तितकेच खास आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 

खासगी आयुष्यात सध्याच्या काळात अतिशय आनंदात असणारी सुष्मिता येत्या काळात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिल्यामुळे तिच्या या Comebackसाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.