Corona : आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

आणखी एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण

Updated: Mar 29, 2021, 09:12 PM IST
Corona : आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. रविवारी बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसीने तो कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिला कोरोनाची लागण झाली आहे. 

फातिमा सना शेखने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. तिने लिहिले की, मी कोविडची चाचणी केली होती आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी घरी क्वांरटाईन असून स्वत:ची काळजी घेत आहे. आपल्या सर्व प्रार्थना आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.

फातिमा सना शेख हिला 'दंगल' चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात तिने गीता फोगटची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या अगोदर अभिनेत्रीने काही चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते.

फातिमा सना शेख अभिनेता अनिल कपूरसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटाविषयी अद्याप फारशी माहिती मिळाली नाही. यापूर्वी अभिनेत्रीने 'लूडो' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. चित्रपटात राजकुमार राव देखील होता. याशिवाय फातिमा सूरज पे मंगल भारी या चित्रपटातही दिसली होती. या सिनेमात अभिनेत्रीच्या विरुद्ध अभिनेत्री मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होते.