'सिंघम' फेम काजल अग्रवालची लगीनघाई

पाहा कोणासोबत ती बांधणार लग्नगाठ 

Updated: Oct 6, 2020, 03:23 PM IST
'सिंघम' फेम काजल अग्रवालची लगीनघाई
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळं लांबलेली शुभकार्य आता पुन्हा एकदा पार पडू लागली आहेत. कलाविश्वातही गेल्या काही दिवसांपासून शुभकार्याची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता सिंघम चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल Kajal Aggarwal हिचासुद्धा समावेश झाला आहे. 

काजलनं एक सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. गौतन किचलू Gautam Kitchlu याच्यासोबत आपण ३० ऑक्टोबरला लग्नगाठ बांधत असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर करत काजलनं आनंद व्यक्त केला. गौतम हा एक व्यावसायिक अल्याचं म्हटलं जात आहे. Discern Living या ई कॉमर्स कंपनीचा तो मालक आहे. 

मुंबईत अत्यंत छोटेखानी आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत काजलचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी दोघांच्याही कुटुंबातील अगदी खास आणि मोजक्या पाहुण्यांचीच उपस्थिती असेल असंही तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. ज्याप्रमाणे कोरोनामुळं अनेकांचं आयुष्यच बदलून गेलं, त्याचप्रमाणे या महमारीनं आपल्या जीवनावरही परिणाम केल्याची बाब तिनं अधोरेखित केली. पण, असं असतानाही आता या नव्या प्रवासासाठी आपण अतिशय उत्सुक असल्याची भावना तिनं व्यक्त केली. 

 
 
 
 

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

 

एखाद्या नववधूप्रमाणा अद्वितीय आनंदाची झलक तिच्या या पोस्टमध्ये पाहायला मिळाली. लग्नानंतर कलाविश्वातून काढता पाय घेण्याच्या चर्चांनाही तिनं यावेळी पूर्णविराम दिला. ज्यामध्ये ज्या गोष्टीला आयुष्यात इतकं जपलं, आनंद लुटला त्या क्षेत्रात काम करणं सुरु ठेवणार असल्याचं म्हणत आता नव्या हेतूनं आणि नव्या अर्थानं ती सर्वांसमोर येईल असा विश्वासही व्यक्त केला. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं तिच्या जीवनातील ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी मित्रांनी लगेचच तिला शुभेच्छा दिल्या.