गरोदर कल्कीचा मोठा निर्णय

हे सारंकाही लपवून ठेवता न आल्यामुळे उचललं महत्त्वाचं पाऊल

Updated: Oct 1, 2019, 11:37 AM IST
गरोदर कल्कीचा मोठा निर्णय
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कल्की केक्ला हिने तिच्या गरोदरपणाची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. ज्यानंतर अनेकांना धक्काच बसला. पाच महिन्यांची गरोदर कल्की आता तिच्या बेबी बंपसह सर्वांसमोर आली आहे. सोशल मीडियावरच तिने हा फोटो शेअर करत यासोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. 

Guy Hershberg आणि कल्की यांच्या नात्याविषयी काही दिवसांपूर्वीच माहिती मिळाली. ज्यानंतर आता या जोडीच्या नात्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची आनंदवार्ता समोर आली. त्यातच आता कल्कीने तिच्या गोरदरपणातील फोटो पोस्ट केल्यामुळे या खास क्षणांसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

मुख्य म्हणजे गरोदरपणात सुरुवातीचे काही महिने सारंकाही सोपं वाटतं. पण, पुढे जाऊन आपण आता बेबी बंप सर्वांनाच दाखवू शकणार आहोत. जुलैपर्यंत विविध प्रकारच्या कपड्यांणध्ये हे सारंकाही दडून जात होतं. पण, सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर मात्र ते अशक्य होतं. त्यामुळे आता कल्कीला काही नव्या डिझायनर कपड्यांच्या मदतीने तिचं बेबी बंप मिरवता येणार आहे. ज्यामध्ये तिला मदत झाली आहे ती म्हणजे एका फॅशन डिझायनरची. 

कल्कीने तिचा हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच कमेंट बॉक्समध्ये कलाविश्वातील काही सेलिब्रिटी मित्रमंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये रिचा चड्ढा, सयानी गुप्ता, रसिका दुग्गल, दिया मिर्झा या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 

जवळपास दोन वर्षांपासून कल्की आणि Guy Hershberg हे रिलेशनशिपमध्ये आहेत. Guy Hershberg हा एक चित्रकार आहे. त्याच्य़ासोबतच्या नात्याने आणि गरोदरपणातील या दिवसांनी आपल्याला एक माणूस म्हणून पुरतं बदललं असल्यातं कल्की 'एचटी ब्रंच'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.