सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनानं केलं चक्कं ऐश्वर्या रायचं कौतुक...

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पीएस वन चित्रपटात राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारत आहे. 

Updated: Oct 2, 2022, 04:20 PM IST
सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनानं केलं चक्कं ऐश्वर्या रायचं कौतुक... title=

Kangana Ranaut on Aishwarya Rai: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच वादात असते. आजपर्यंत अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परंतु आता कंगनाच एक नवं रूप पाहायला मिळालं आहे. सध्या ऐश्वर्याचा पोन्नीवन सेल्वन पार्ट वन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री ऐश्वर्याचं चक्क कौतुक करताना कंगना दिसली आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ऐश्वर्याला पडद्यावरची खरी राणी म्हणत तिची प्रशंसा केली आहे. (bollywood actress kangana ranaut praises aishawarya rai bachchan for her role in Ponniyin Selvan 1)

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पीएस वन चित्रपटात राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात ऐश्वर्याशिवाय साऊथ सुपरस्टार चियान विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, त्रिशा कृष्णन यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषांबरोबरच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटातील ऐश्वर्याच्या गेटअप आणि अभिनयाचे कौतुक करताना बॉलिवूड स्टार्सही दिसत आहेत. 

कंगना राणावतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन गोष्टी शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी PS-1 चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, मी अनेक दिग्गज कलाकारांचे काम पाहण्याची वाट पाहत होते. दुसऱ्या पोस्टमध्ये कंगना राणौतने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ऐश्वर्या राय बच्चनच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे आणि मागे उभ्या असलेल्या जया बच्चन हे पाहून खूश आहेत. फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, "अल्टीमेट क्वीन ऐश्वर्या राय बच्चनला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे''

या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिकेत आहे. त्याची दोन्ही पात्रे खूप दमदार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या राय बच्चन दीर्घ काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी ती करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसली होती.