मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान ( Kareena Kapoor) आणि तिचं कुटुंब कायमच प्रकाशझोतात असतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय नामवंत आणि गाजलेल्या कुटुंबातील या चेहऱ्यांवर माध्यमांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात. माध्यमांकडून कपूर कुटुंबातील सदस्यांना कायमच प्रेम मिळतं, पण यावेळी मात्र याच कपूर कुटुंबातील एका सदस्यावर माध्यमांकडून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
फक्त नाराजीच नव्हे, तर अनेक नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्री करीना कपूर हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्यामुळं करीनाला नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे तो म्हणजे तिचाच मोठा मुलगा तैमूर (Taimur). सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तैमूर कुठूनतरी बाहेर आल्यानंतर लगेचच कॅमेरामनवर चिडला आणि काहीतरीच ओरडू लागल्याचं दिसून आलं. पुढे त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून असणाऱ्या नॅनीनं त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, तर तो तिचाही हात धुडकावून निघून गेला.
अंबानींच्याही घराला लाजवेल टायगर श्रॉफचा आशियाना; फोटो पाहून म्हणाल 'घर हो तो ऐसा...'
छोट्या नवाबचा हा उद्दामपणा आणि ही वर्तणूक पाहता नेटकऱ्यांनी करीनाचीच शाळा घेण्यास सुरुवात केली. याला आधी मोठ्यांचा आदर करायला शिकवा असं म्हणत तिला ट्रोलही करण्यात आलं.
कायमच माध्यमांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असणाऱ्या तैमुरनं यावेळी मात्र त्यांचीच निराशा केली आहे. त्यामुळं आता पुढच्या वेळी जेव्हा तो माध्यमांसमोर येईल तेव्हा त्याच्या वागण्यामध्ये काही बदल झालेला असेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.