करिष्माची अदा पाहून होतेय ‘या’ चित्रपटाची आठवण

तिचा हा चित्रपट बराच गाजला होता. 

Updated: Sep 25, 2018, 10:08 PM IST
करिष्माची अदा पाहून होतेय ‘या’ चित्रपटाची आठवण

मुंबई: चित्रपट विश्व आणि फॅशन जगत या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. रोजच्या बदलत्या फॅशनच्या दुनियेत कालाकार मंडळीसुद्धा फॅशनचे काही नवे फंडे आजमावून पाहतात. त्यात काहींच्या वाट्याला यश येतं तर काही मात्र अपयशी ठरतात. अशाच सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव म्हणजे करिष्मा कपूर.

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि चित्रपटातील भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या करिष्मा कपूरकडे ‘फॅशन डिवा’ म्हणूनही पाहिलं जातं.

दोन मुलांची आई असणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यांने नेहमीच अनेकांना घायाळ करते. त्यातही तिचा फॅशनकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही औरच.

अशी ही बी टाऊनची सौंदर्यवती सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

 
 
 
 

 

#evenings in @anitadongre styled by @eshaamiin1

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिष्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला फोटो पाहून तिच्याच एका चित्रपटाची आठवण होत आहे.

अनिता डोंगरेने डिझाईन केलेल्या या लांब बाह्यांच्या ड्रेसमधील करिष्माकडे पाहून लगेचच आठवणारा चित्रपट म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’. 

कपाळावर निळ्या रंगाची टिकली, पायात जुती आणि चेहऱ्यावर तितकंच सुरेख हास्य पाहता करिष्मा पुन्हा एकदा तिनेच साकारलेल्या ‘आरती सेहेगल’ या पात्राची आठवण करुन देत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.