बाब्बो | कॅट-विकीच्या लग्नात पाहुण्यांची शाही बडदास्त, तब्बल इतक्या भाज्यांचा मेनू

सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे ती अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाहाची.   

Updated: Dec 7, 2021, 11:13 PM IST
बाब्बो | कॅट-विकीच्या लग्नात पाहुण्यांची शाही बडदास्त, तब्बल इतक्या भाज्यांचा मेनू

मुंबई : सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे ती अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाहाची. कतरिना-विकीच्या लग्नाची घटिका जसजशी जवळ येतेय तसतसे बरवाडामध्ये घडत असलेल्या घडामोडीही समोर येत आहेत.आज कतरिना आणि विकीचा संगीत सोहळा रंगतोय. कॅट-विकीच्या लग्न सोहळ्यात विशेष असं काय आहे, हे आपण पाहुयात. (bollywood actress katrina kaif and vicky kaushal wedding vegetables)

उगाच नाही म्हटलं जातं की कतरिना-विकीचा शाही विवाहसोहळा. कारण जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून कतरिना-विकी या लग्नसोहळ्याची तयारी करत आहेत. मग ते लग्नासाठीचं डिस्टीनेशन म्हणून खास ऐतिहासिक किल्ल्यावरचं लॅव्हिश हॉटेल असो किंवा खास पाहुण्यांची राखलेली बडदास्त असो.

विकी-कतरिनाच्या लग्नात शाही थाट

लग्नासाठी एकूण 75 परदेशी भाज्या असणार आहेत. यामध्ये ब्रोकोली, फिंगर लाइम, अॅव्हाकाडो, बनाना लिव्हस्,अस्पॅरॅगस थाय या आणि अशा विविध भाज्यांचा समावेश आहे. तर या व्यतिरिक्त 70 भाज्या आणि 76 प्रकाराची फळंही आहेत. हे सर्व  पाहुण्यांसाठी मागवण्यात आलेत.

विशेष म्हणजे बरवाड्यातला एक किरकोळ विक्रेत्यानेच सिक्स सेन्स हॉटेलला हे सगळं पुरवलं आहे.

सेलिब्रिटीही आपल्या सोयीनुसार दाखल होतायत. काही जण सेलिब्रिटी संगीताला, काही हळदीला तर काही सेलिब्रीटी थेट लग्नाला म्हणजे 9 डिसेंबरला येणार आहेत.

कडेकोट सुरक्षा आणि....

लग्नात कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी आणि पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी 200 बाऊंसर्ससह 120 पोलीस कामाला लागले आहेत. इतकंच नाही तर सेलिब्रिटींना खास कोड वर्ड देण्यात आलंय. जो विना आमंत्रणाचा लग्नाला आला आहे, त्याला एन्ट्रीच दिली जाणार नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्टही बंधनकार केली गेली आहे. तसंच हॉटेलमध्ये खास मेडिकलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 2 डॉक्टर आणि 2 रुग्णवाहिकाही उपलब्ध असणार आहेत.  

संगीत सोहळा

कतरिना-विकीच्या लग्नाआधी चर्चा आही ती संगीत सोहळ्याची. कारण या सोहळ्यात करण जोहर, फराह खान विशेष भूमिकेत असणार आहेत. तर या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी ताल धरणार आहेत. विशेष म्हणजे संगीत सोहळ्यात कतरिना-विकी ''तेरी ओर ''गाण्यावर थिरकरणार आहे.

रात्रीपासून पहाटेपर्यंत हा संगीत सोहळा रंगणार आहे. खास संगीत सोहळ्यासाठी पॉप्युलर पंजाबी सिंगर गुरुदास मनही दाखल झालाय.

या दोघांचा हळद आणि मेंहदीचा कार्यक्रम 8 डिसेंबरला रंगणार आहे. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडणार आहे.