मेकअप आर्टिस्टच्या 'गे वेडिंग'ला कतरिनाची मस्ती; व्हिडिओ व्हायरल

गोव्यात लग्नसोहळ्यासाठी कतरिनाची हजेरी

Updated: Jan 6, 2020, 12:19 PM IST
मेकअप आर्टिस्टच्या 'गे वेडिंग'ला कतरिनाची मस्ती; व्हिडिओ व्हायरल title=
फोटो सौजन्य : Instagram Daniel C Bauer, Katrina kaif

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) नेहमी तिच्या टीमला कुटुंबाप्रमाणे ट्रीट करत असल्याचं पाहायला मिळतं. कतरिनाचा मेकअप आर्टिस्ट डॅनियल सी बाऊर (Daniel C Bauer) त्याच्या बॉयफ्रेंडसोबत नुकताच विवाहबंधनात अडकला. डॅनियल सी बाऊर आणि त्याच्या बॉयफ्रेंडचा लग्नसोहळा गोव्यात पार पडला. या लग्नात कतरिनानेही हजेरी लावली होती. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

कतरिनाचा मेकअप आर्टिस्ट डॅनियल सी ब्राऊरचा विवाह त्याचा बॉयफ्रेंड टायरोन ब्रगनजाशी (Tyrone Braganza)झाला. हिंदू-रिती-रिवाजानुसार दोघांचा विवाह पार पडला. कतरिनाने डॅनियल सी ब्राऊर आणि टायरोन ब्रगनजा या दोघांच्या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टास्टोरीवर शेयर केले होते.

फोटोमध्ये ते दोघेही पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. डॅनियलनेही त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून हळद, मेहेंदी, संगीत कार्यक्रमातील झलक पाहायला मिळतेय.

या दोघांच्या लग्नात कतरिना पेस्टल ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. लग्नात तिने तिच्या 'जिलेबी' गाण्यावर डान्सही सादर केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Write it on your heart that every day is the best day of the year  #2020

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

गेल्या वर्षी सलमान खान स्टारर 'भारत' चित्रपटात कतरिनाने भूमिका साकारली होती. लवकरच कतरिना अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' चित्रपटातून प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी 'सूर्यवंशी' चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून करण जौहर चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यापूर्वी अक्षय आणि कतरिना या जोडीने बॉलिवूडमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत. या जोडीला प्रेक्षकांची पंसतीही मिळाली होती. आता पुन्हा एकदा या अक्षय-कतरिना जोडीला, 'सूर्यवंशी'ला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.