close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अखेर सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिनाचा खुलासा

१६ वर्षांपासून आम्ही...

Updated: Sep 22, 2019, 03:36 PM IST
अखेर सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिनाचा खुलासा

मुंबई : हिंदी कलाविश्वातील 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' म्हणून सलमान खाकडे पाहिलं जातं. आतापर्यंतच्या कारकिर्दीत बऱ्याच अभिनेत्रींशी सलमानचं नाव जोडलं गेलं आहेत. त्याची प्रेमप्रकरणं हा काही चाहत्यांसाठी नवा विषय नाही. पण, या नावांच्या गर्दीत एक नाव असं आहे, जी सलमान खानला तिच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्त्व तर देते, पण, त्याच्यासोबतच्या नात्याविषयीची खुलेपणाने व्यक्त होते.

'दबंग खान'विषयी मनमोकेळेपणाने आणि तितक्याच आपलेपणाने बोलणारी अभिनेत्री आहे, कतरिना कैफ. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमातील मुलाखत सत्रात बोलतेवेळी कतरिनाने तिच्या आणि सलमानच्या नात्याविषयी असं काही वक्तव्य केलं की सर्वांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. 

एकेकाळी सलमान आणि कतरिनाच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, तेव्हा मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयीच्या कोणत्याच चर्चांना दुजोरा दिला नाही. आता कतरिनानेच या नात्याची खरी बाजू सर्वांसमोर आणली आहे. 

'ही एक मैत्री आहे.... जी जवळपास १६ वर्षांपासून टीकून आहे. सलमान खरंच एक अतिशय चांगला मित्र आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा तेव्हा तो तुमच्या मदतीसाठी हजर राहणारा आहे. तो सर्वांशीच कायम संपर्कात नसेलही. पण, मित्रांसोबत आणि मित्रांसाठी तो कायमच उभा असतो. त्यांच्या मदतीसाठी हजर असतो', असं कतरिना म्हणाली. मैत्री असो किंवा आणखी काही, कतरिना आणि सलमानचा विषय आला की चर्चांना उधाणच येतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

ब्रेकअपविषयी कतरिना म्हणाली...

जवळपास तीन वर्षांपूर्वीच रणबीर कपूर आणि कतरिना यांच्या नात्यात दुरावा आला. ज्यानंतर कतरिनाने काही अडचणींचा सामना केला. पण, आपण त्यातूनही काहीतरी शिकलो हेच भाव तिने या मुलाखतीत व्यक्त केले. 

'हो ते एक नातं होतं. प्रत्येक नातं खूप काही शिकवून जातं. ते तुमच्या डोक्यावर स्वार होतं, तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरता ते दाखवून देतं, तुम्हाला बळकटी देतं त्याचप्रमाणे तो अनुभवही अतिशय चांगला होता', असं ती म्हणाली. एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकमेकांकडून काय शिकायला मिळालं यालाच आपण महत्त्व दिल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.