क्रिती सेनन होणार आई? फोटो व्हायरल

तिचं हे रुप अनेक प्रश्न उपस्थित करणारं आहे

Updated: Feb 23, 2020, 11:18 AM IST
क्रिती सेनन होणार आई? फोटो व्हायरल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ‘बरेली की बर्फी’, ‘लुकाछुपी’, ‘हाऊसफुल 4’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री क्रिती सोनन आता तिच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. पण, या साऱ्यामध्येच तिच्या गरोदरपणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्य म्हणजे क्रितीच्या खासगी आयुष्याविषयी फार काही माहिती सर्वांसमोर उघड झालेली नाही. शिवाय गेल्या काही काळामध्ये तिच्या लग्नाविषयीसुद्धा काहीच बोललंही गेलं नाही. त्यातच आता थेट गरोदरपणाच्या चर्चांनी जोर धरल्यामुळे कलाविश्वासोबत चाहत्यांनाही हे सारंकाही थक्क करणारं ठरत आहे. 

क्रितीचा एक फोटो सध्या सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये ती गरोदर असल्याचं दिसत आहे. सलवार, कुर्ता, आणि स्वेटर घालून ती शांतपणे एका ठिकाणी बसली असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे तिचं हे रुप अनेक प्रश्न उपस्थित करणारं असलं तरीही त्याचा तिच्या खऱ्या जीवनाशी थेट संबंध नाही. 

कारण, क्रितीन हे सारंकाही तिच्या आगामी चित्रपटासाठी केलं आहे. 'मिमी' असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव. नुकतच या चित्रपटातं चित्रीकरण सुरु झालं असून, या चित्रपटाच्या सेटवरील क्रितीचा फोटो लीक झाला आहे.  'मिमी’ या चित्रपटातून क्रिती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी तिने तब्बल १५ किलो वजन वाढवलं आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

एका 'सरोगेट मदर'भोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. ज्यामध्ये क्रितीशिवाय पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक, सई ताम्हणकर हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटानंतर क्रिती अक्षयकुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातही झळकणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x