मुलांच्या जन्मासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसलेल्या अभिनेत्रीनं उचललं हे पाऊल

आमिर खानच्या  '3 इडियट्स' या चित्रपटातून ती झळकली होती.   

Updated: Nov 23, 2020, 03:20 PM IST
मुलांच्या जन्मासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसलेल्या अभिनेत्रीनं उचललं हे पाऊल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोणत्याही स्त्रीसाठी मातृत्त्वाचं महत्त्वं अधिक असतं. पण, याच संकल्पनेबाबत काहींच्या धारणा आणि दृष्टीकोन मात्र कमालीचे वेगळे असतात. 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतून मुख्य भूमिकेत झळकलेल्या आणि अभिनेता आमिर खान याच्यासोबत '3 इडियट्स' या चित्रपटातून स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्री मोना सिंह Mona Singh हिनंही सध्या याच मुद्द्यावरुन अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 

मोनानं वयाच्या 39 व्या वर्षी लग्न केलं. ज्यानंतर आता नुकत्याच एका मुलाखतीच्या माध्यमातून तिनं वाढतं वय आणि मातृत्त्वाची आपल्याला कोणतीही चिंता नसल्याचं सांगितलं. 

टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तिनं मातृत्त्वासाठी आपण frozen eggs चा पर्याय निवडल्याचं सांगितलं. वयाच्या 34 व्या वर्षीच मोनानं हे पाऊल उचललं होतं. त्यामुळं आता ती मनमुराद आयुष्य जगून पतीला आणि तिला हवं तेव्हाच बाळाच्या जन्माचा निर्णय घेऊ शकते. 

मागील वर्षी श्याम गोपालन याच्याशी विवाहबंधनात अडकलेली मोना याचबाबत माहिती देत म्हणाली, 'फ्रोजन एग्जच्या पर्यायामुळं आता मी मोकळी आहे. मी हे वयाच्या 34 व्या वर्षीच केलं. कारण, मी तर आता विवाहबंधनात अडकले. मला मा्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायचा आहे. जग फिरायचं आहे मी हे सारं कधीच केलं नाही. मी कायमच मित्र आणि कुटुंबीयांसमवेत फिरले आहे'. 

आपल्याला मुलं आवडतात. पण, सध्याच्या घडीला विचारायचं झाल्यास त्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार नाही असं म्हणत भविष्यात याबाबतचा विचार नक्की करु असं मोना म्हणाली. 

मुख्य म्हणजे मोनाच्या या निर्णयामध्ये तिला आईनंही साथ दिली. मुळात त्या या निर्णयानं आनंदित झाल्या होत्या. फ्रोजन एग्जच्या पर्यायासाठी काही महिन्यांचा कालावधी गेला. त्यासाठी पुण्याच्या एका डॉक्टरांशी संपर्क साधत मोना कामापासून दूर राहिली. या प्रक्रियेत 'मूड स्विंग्स' होण्याचीही शक्यता असते. त्यामुळं तिनं कामापासून दुरावा पत्करला होता. पण, आता मात्र मुक्तपणाच्या भावनेनं ती जगण्याचा मनमुराद आनंद घेत आहे. 

 

मोनाच्या या मुलाखतीनंतर तिच्या या निर्णयाचं अनेकांनीच स्वगात केलं. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं दिला आहे अशीच चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वर्तुळात सुरु आहे.