प्रसिद्ध अभिनेत्रीचं कॅनडामध्ये निधन; भावाने दिली महिती

बॉलिवूडला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन

Updated: Oct 23, 2021, 01:11 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचं कॅनडामध्ये निधन;  भावाने दिली महिती title=

मुंबई : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांचं 23 ऑक्टोबर रोजी निधण झालं आहे. कॅनडामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुमताज  यांच्या भावाने त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या भावाचं नाव अनवर अली असं आहे. मीनू मुमताज यांच्या भावाने बहिणीच्या मृत्यूची बातमी देत इंडस्ट्री, मीडिया, त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार देखील मानले. मीनू मुमताज दिग्गज विनोदवीर महमूद अली यांच्या बहिण आहेत. 

मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 1950 ते 1960 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. मुमताज फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या प्रसिद्ध डान्सर देखील होत्या. मीनू यांनी त्यांच्या करियरची सुरूवात एक डान्सर म्हणून केली.  त्यानंतर 50 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून भूमिका बजावली. 

 'सखी हातीम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्या बलराज साहनीसोबत मुख्य भूमिकेत होत्या. मीनू मुमताज गुरु दत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये देखील झळकल्या होत्या. मुमताज यांनी 'वे कागज का  फूल', 'चौदवीं का चांद', 'साहिब बीवी और गुलाम', 'ताजमहल', 'घूंघट', 'इंसान जाग उठा', 'घर बसाके देखो', 'गजल'  यांरख्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या.