मुंबई : नर्गिस फाखरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. जी कधीही आपल्या मनातलं बोलण्यास घाबरत नाही. तिच्या मनात जे काही येईल, ती त्या गोष्टी सर्वांसमोर धीटपणे सांगते. यामुळे तिला अनेकवेळा अडचणींचाही सामना करावा लागला आहे. पण या अभिनेत्रीला तिच्याबद्दल कोणी काय म्हणतंय याविषयी काही फरक पडत नाही. नर्गिस फाखरी किती बिंधास्त आहे, हे तुम्ही करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये पाहिलंच असेल.
फ्रिडा पिंटोसोबत नर्गिस फाखरी या शोमध्ये सहभागी झाली होती. जिथे दोघांनी खूप वादग्रस्त गोष्टी बोलल्या होत्या. बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणाऱ्या नर्गिसच्या अशाच वादग्रस्त कमेंटबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नर्गिस फाखरीने 'अजहर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान इमरान हाश्मीने या चित्रपटात सर्वाधिक किसिंग सीन केल्याचं सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. नर्गिस फाखरीच्या म्हणण्यानुसार, ''इमरान हाश्मीला किस करत असताना त्याच्या मिशा तिला वारंवार त्रास देत होत्या. या मिशा किती मोठ्या आहेत हे तुम्ही पाहू शकता. या मिशांसह मी इम्रानला किस कसं केलं हे मला फक्त माहित आहे. मला असं म्हणायचं आहे की, माझ्यापेक्षा इमरान हाश्मीने या किसिंग सीन्सचा जास्त आनंद घेतला आहे.
नर्गीस फाखरी हिने रॉकस्टार चित्रपटानंतर मद्रास कॅफे या चित्रपटातही काम केलं. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. मात्र, ही भूमिका देखील लक्षवेधी होती. त्यानंतर 'फटा पोस्टर निकला हिरो' हा चित्रपट केला होता. या चित्रपटात तिच्यापेक्षा तिच्या अभिनेत्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.
आतादेखील नर्गीस फाखरी हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या वर नर्गीस फाखरी म्हणाली की, लोकं माझ्या ओठांवर बोलतात. मी काय बोलावं तेच मला कळत नाही. लोक असं का करत असतील, हे समजत नाही. जर माझा प्रायव्हेट पार्ट मोठा असता तर लोकं माझ्याप्रायव्हेट पार्टबद्दल देखील बोलले असते. अशी नाराजीही तिने व्यक्त केली. अभिनेत्रीचं हे वक्तव्य जूनं असलं तरीही हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.