close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नव्या घरासाठी प्रियांका- निकचं बजेट ऐकून थक्कच व्हाल

अबब! अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे... 

Updated: Aug 8, 2019, 10:07 AM IST
नव्या घरासाठी प्रियांका- निकचं बजेट ऐकून थक्कच व्हाल

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकली. अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांकाने तिच्या कामासोबतच कुटुंबालाही प्राधान्य दिलं. निकच्या आणि स्वत:च्या कुटुंबातील एक दुवा असणारी प्रियांका सध्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहे. ही गोष्ट म्हणते तिचं कोणतं आगामी प्रोजेक्ट किंवा एखादा फॅशन इव्हेंट नव्हे. तर, बी- टाऊनही ही 'देसी गर्ल' सध्या एका दुसऱ्याच कामात व्यग्र असल्याचं म्हटलं जात आहे. 

फक्त प्रियांकाच नव्हे, तर निकचीही तिला यात साथ मिळत आहे. कारण, ये 'घर' का मामला है. 'टीएमझेड'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार प्रियांका आणि निक म्हणजेच चाहत्यांचे लाडके निक्यांका सध्या एका नव्या घराच्या शोधात आहेत. ज्यासाठी निकने त्याचं लॉस एंजेलिसमधील घर विकल्याचं म्हटलं जात आहे. 

प्रियांकासोबत उर्वरित आयुष्यातील काही सुरेख क्षणांचं साक्षीदार होण्यासाठी म्हणून तो एका सुरेख आणि तितक्याच आलिशान घराच्या शोधात आहे. या दोघांचीही आलिशानची परिभाषा काय आहे, हे त्यांनी घरासाठी ठेवलेल्या अपेक्षित किंमतीचा आकडा पाहून लक्षात येत आहे. तब्बल २० मिलियन युएस डॉलर्स इतक्या किमतीचं घर खरेदी करण्याची तयारी या दोघांकडून दाखवण्यात आली आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सूत्रांच्या माहितीनुसार यासाठी निकने त्याचं ६.९ मिलियन युएस डॉलर्स किमतीचं घर विकलं असून, आता तो पत्नीच्या म्हणजेच प्रियांकाच्या साथीने नवा आशियाना शोधत आहे. किंबहुना यासाठी त्यांनी काही घरं, प्रशस्त बंगले पाहण्यास सुरुवातही केली आहे. त्यामुळे आता किंमतीला आणि प्रतिष्ठेला साजेसं असं प्रियांका- निकचं नवं घर नेमकं कसं असेल याचीच उत्सुकता चाहत्यांसोबतच रिअल इस्टेट आणि कलावर्तुळातही पाहायला मिळत आहे.