Russia Ukraine Conflict शी प्रियांकाचं कनेक्शन; पुढाकार घेत 'देसी गर्ल' म्हणते....

सर्वजण युद्धविरामाचीच मागणी करत युक्रेनच्या बाजूनं उभे असल्याचं दिसत आहे.   

Updated: Feb 26, 2022, 02:07 PM IST
Russia Ukraine Conflict शी प्रियांकाचं कनेक्शन; पुढाकार घेत 'देसी गर्ल' म्हणते....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सध्या संपूर्ण जगावर रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम दिसून येत आहेत. परिस्थिती अत्यंत तणावाची झाली आहे. निष्पाप नागरिकांना नाईलाजानं देश सोडावा लागत आहे. ही परिस्थिती ओढावलेली असताना बऱ्याच संस्थांनी पुढाकार घेत चर्चेच्या मार्गानं यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. (Russia Ukraine Conflict )

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जगातील प्रत्येकाचं या युद्धाशी, त्यामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाशी जणू एक नातं जोडलं गेलं आहे. 

काळजीपोटी, भीतीपोटी सर्वजण युद्धविरामाचीच मागणी करत युक्रेनच्या बाजूनं उभे असल्याचं दिसत आहे. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा यात मागं राहिलेली नाही. परिस्थिती कधी इतक्या तणावाच्या वळणावर पोहोचली हे कळलंच नाही, असं म्हणत तिनं ही परिस्थिती अत्यंत भयावह असल्याचं वक्तव्य केलं. 

एका व्हिडीओच्या माध्यमातून तिनं आपली भूमिका स्पष्ट केली. सोबतच युक्रेनच्या नागरिकांना, गरजूंना मदत करण्याचं आवाहन या देसी गर्लनं केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

दुसरीकडे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी अभिनेता सोनू सूद यानं भारतीय दुतावासाकडे विनंती केली. सुत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला भारतातील 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत.