महेश भट्ट यांना स्वत:च्याच मुलीशी का करायचं होतं लग्न; Kiss करत माजवलेली एकच खळबळ

रुपेरी पडद्यासोबतच ती चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलं ते म्हणजे आणखी एक कारण. तिचं खासगी आयुष्य़.   

Updated: Feb 26, 2022, 01:09 PM IST
महेश भट्ट यांना स्वत:च्याच मुलीशी का करायचं होतं लग्न; Kiss करत माजवलेली एकच खळबळ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नव्वदच्या दशकात काही कलाकार नावारुपास आले, प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. अशाच कलाकारांमधलं एक नाव म्हणजे अभिनेत्री पूजा भट्ट. वयाची पन्नाशी गाठणारी हीच पूजा एकेकाळी तरुणांच्या काळजात घर करुन होती. 

रुपेरी पडद्यासोबतच ती चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलं ते म्हणजे आणखी एक कारण. तिचं खासगी आयुष्य़. 

काही दिवसांपूर्वीच 'बॉम्बे बेगम्स'  या सीरिजमधून पूजा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. निमित्त नवं होतं, पण चर्चेत आल्यांतर काही जुन्या गोष्टींनाच पुन्हा वाव मिळाला. 

पूजा आणि तिचे दिग्दर्शक वडील महेश भट्ट यांच्या नात्याची सर्वांना माहिती. खुद्द पूजानं अभिनयानंतर वडिलांच्या साथीनं दिग्दर्शनातही पाऊल टाकलं. 

पण, हे नातं तेव्हा धक्का देऊन गेलं जेव्हा महेश भट्ट यांनी स्वत:च्याच लेकिशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 

एका मासिकासाठी महेश आणि पूजा भट्ट यांनी बोल्ड फोटोशूट केलं. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पूजाच्या सौंदर्यावर महेश भट्ट इतके भाळले की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती. 

pooja bhatt

मुलीच्या सौंदर्याची अशी प्रशंसा करत भट्ट यांनी जणू सर्वांना हादरा दिला होता. 

आपल्या या वक्तव्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात रोषाचा सामना करावा लागला होता. ते नैराश्यात गेले होते. अखेर त्यांनी सर्वांती क्षमा मागितली, तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झालं.