मुंबई : प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. कारण ट्विटर आणि इन्स्टा बायोमधून प्रियंकानं आपल्या नवऱ्याचं आडनाव उडवलंय. त्यांचं नेमकं काय चाललंय, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (bollywood actress priyanka chopra remove her husband nick surname in twitter and instagram bio)
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांच्यामध्ये सगळं आलबेल नसल्याची चर्चा बी टाऊनमध्ये सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय प्रियंकाचं इन्स्टाग्रामच्या बायोमधून 'जोनस' हे नवऱ्याचं आडनाव हटवणं. प्रियंकानं अचानकच जोनसचा उल्लेख काढल्यामुळे दोघं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा सुरू झालीये.
राजस्थानमध्ये प्रियंका आणि निकचा शाही विवाहसोहळा झाला होता. बॉलिवूड-हॉलिवूडच्या अनेक बड्या हस्ती त्याला हजर होत्या. लग्नानंतर प्रियंकानं आपल्या इन्स्टा आणि ट्वविटर हँडलमध्ये पतीचं आडनाव जोडत 'प्रियंका चोप्रा जोनस' असं केलं होतं. तिनं नावातील जोनसला अचानक अलविदा का केला, असा प्रश्न फॅन्सना पडलाय.अर्थात प्रियंकाची आई मधू यांनी या चर्चेत तत्थ्य नसल्याचं म्हटलंय.
प्रियंका आणि निकच्या घटस्फोटाच्या अफवा या बकवास आणि चुकीच्या आहेत. लोकांनी अशा कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवू नयेत, असं आवाहन मधू चोप्रांनी ट्विटरवरून केलंय...
तर सोमवारी निकनं आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता. त्याला प्रियंकानं रिप्लाय केलाय. 'डॅम !...आय जस्ट डाईड इन युअर आर्म्स' असा रिप्लाय करत बदामाचे इमोजी टाकलेत. यावरून घटस्फोटांची चर्चा तितकीशी खरी नसल्याचंच दिसत असलं तरी नावातून जोनस का काढलं, याचं उत्तर प्रियंकाच देऊ शकेल.