रेखाच्या सख्ख्या लहान बहीणीला पाहिलंय? अभिनय सोडून करते 'हे' काम

Rekha Sister Radha Ganeshan: अभिनेत्री रेखा यांची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. तेव्हा चला तर मग पाहूया की रेखाची सख्खी बहीण नक्की काय करते? त्यांच्या फोटोंची अनेकदा चर्चा रंगलेली असते. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 23, 2023, 07:26 PM IST
रेखाच्या सख्ख्या लहान बहीणीला पाहिलंय? अभिनय सोडून करते 'हे' काम title=
June 23, 2023 | bollywood actress rekha look alike her sister radha ganehan photos goes viral

Rekha Sister Radha Ganeshan: अभिनेत्री रेखा ही आपल्या हटके अभिनयासाठी आणि डान्स स्टाईलसाठी ओळखली जाते. रेखा ही आजही तिच्या वैयक्तिक बाबींसाठी लोकप्रिय असते, जसे की अमिताभ आणि रेखाचे अफेअर. परंतु तुम्हाला रेखाच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे का? रेखाच्या आयुष्यात अनेक पुरूष आले तरीही आज ती मात्र एकटीच आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा रंगताना दिसत असल्या तरीसुद्धा तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. 60 आणि 70-80 च्या दशकात अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं ही जिंकून घेतली होती. तिच्या नृत्यानं प्रत्येक तरूणाचे हृदय तिनं जिंकून घेतले होते. आजही आपण तिचे परफॉमन्स पाहिले तर आपल्याला त्याची कल्पना येईलच. परंतु तुम्हाला माहितीये का की रेखा मिळून त्या एकूण सहा बहिणी आहेत. 

आणि त्यापैंकी सर्वात लहान बहिणीचीही आज चांगलची चर्चा होताना दिसते. रेखा यांच्या धाकट्या बहिणीचे नावं आहे राधा गणेशन. त्याही अगदी हूबेहूब रेखा यांच्यासारख्याच दिसतात. त्यांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांना बॉबी देओल आणि ऋषि कपूर यांच्यासह चित्रपट करण्याची ऑफर आली होती. परंतु आता त्या नक्की काय करतात? जाणून घेऊया या लेखातून. समोर आलेल्या माहितीनुसार असं कळतं की त्या सध्या लाईमलाईटपासून दूर आहेत परंतु त्या आपली बहीण रेखा हिच्यासह बॉलिवूडच्या किंवा अन्य कार्यक्रमांनाही हजेरी लावतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसते. त्यांचे अनेक फोटो हे व्हायरल देखील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी सामान्य नागरिकांनाही फार कुतूहल आहे. 

हेही वाचा - व्यायामशिवाय 'या' अभिनेत्रीनं केलं Weight Loss; लवकरच झळकणार हॉलिवूडपटात!

राधा गणेशन यांचा जन्म 1955 साली तमिलनाडू चेन्नई येथे झाला. त्या सहा बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. त्यांनी सोफिया कॉलेजमधून आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. त्यांनी कमर्शियल आर्ट आणि टेक्सटाईल डिजाइनिंगमधून डिग्री संपादन केली आहे. त्यांनी 1981 साली हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे लेखक आणि दिग्दर्शक एसएस अब्बास यांचे चिरंजीव उस्मान सैयद यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर त्या अमेरिकत स्थायिक झाल्या होत्या. त्यांना दोन मुलगेही आहेत. ज्याचे नावं आहेत नवीद सैयद आणि अमन सैयद. या दोघांची लग्न झाली आहेत आणि त्यांनीही मुलं आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांच्या कुटुंबियांविषयी अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे त्यांच्या भावडांबद्दलही फारच कमी माहिती असते. परंतु त्यांची चर्चाही खूप असते. त्यातून ते फारच लॉ प्राफाईलही असतात.