Rimi Sen : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेननं लग्झरी गाडी बनवणारी कंपनी लॅन्ड रोव्हर विरोधात खटला दाखल केला आहे. त्या खटल्यात रिमीनं भरपाई म्हणून 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे. रिमीनं दावा केला की ही एक फार वाईट गाडी आहे आणि 2020 मध्ये तिनं ही गाडी खरेदी केली होती. तेव्हापासून तिला त्रास आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तिनं कंपनीवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. नक्की असं काय झालं आणि रिमीनं असे आरोप का केलेत हे जाणून घेऊया...
रिमी सेननं जॅगव्हार लॅन्ड रोव्हरचे ऑथोराइज्ड डीलर सतीश मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडशी 92 लाख रुपयात ही गाडी खरेदी केली होती. तर ही गाडी व्हॅलिड वॉरंटीसोबत जानेवारी 2020 ला तिला मिळाली. खरंतर कोव्हिडमुळे आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे गाडीटा वापर हा खूप कमी झाला. तर तिनं आरोप केला की जेव्हा तिनं ही गाडी नियमितपणे चालवण्यास सुरुवात केली, तेव्हा सनरूफ, साउंड सिस्टम आणि रिएर-अॅन्ड कॅमेराशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
या संकटांमुळे 25 ऑगस्ट 2022 ला एक मोठी घटना घडली. कथितपणे रेअर एंड कॅमेरा खराब झाल्यामुळे गाडीनं एका खांब्याला जाऊन धडक दिली. डीलरशिपला या सगळ्या समस्यांविषयी माहिती देण्यात आली, पण रिमी सेनचा दावा आहे की तिनं केलेल्या तक्रारीला योग्य प्रकारे हातळण्यात आलं नाही. तिच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याआधी तिच्याकडे या सगळ्याचे पुरावे मागण्यात आले. त्यामुळे सतत त्याच्या रिपेअरिंगचं काम हे सुरुच राहिलं. एकीकडे एक प्रॉब्लम ठीक झाला की दुसरीकडे दुसरी समस्या समोर येऊन थांबायची.
दरम्यान, रिमी सेननं केलेल्या या खटल्यात असं म्हटलं आहे की गाडीत सुरुवाती पासूनच काही तरी बिघाड होती. मग ती बनवताना असो किंवा मग ऑथोराइज्ड डीलरनं त्याला नीट ठेवलं नाही म्हणून असो. तिनं सांगितलं की गाडीला 10 पेक्षा जास्त वेळी रिपेअरिंसाठी पाठवण्यात आलं. तरी देखील समस्या या उद्भवू लागल्या, ज्यामुळे तिला मानसिक छळ आणि गैरसोय होऊ लागली.
या समस्येमुळे रिमी सेननं तिला आलेल्या समस्यांसाठी 50 कोटी भरपाई म्हणून मागितले आहे. त्यासोबत कायदेशीर खर्चासाठी 10 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे. याशिवाय तिनं ही डिफेक्टिव्ह गाडी बदलण्याची मागणी केली आहे.