बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमाने हुरळून त्याने असं काही केलं की...

अभिनेत्रीने सुट्ट्यांमधील एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Updated: Aug 24, 2019, 06:13 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमाने हुरळून त्याने असं काही केलं की... title=

मुंबई : अभिनेत्री रिया सेन सध्या बॉलिवूडपासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रिया अफ्रिकामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. रियाने या सुट्ट्यांमधील एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. \Video: हीरोइन ने दिखाया थोड़ा लाड़ और अचानक जिराफ ने कर लिया French KISS

या व्हिडिओमध्ये रिया एका जंगलात जिराफासोबत दिसतेय. अचानक जिराफ पुढे येऊन रियाच्या तोंडाला चाटायला सुरुवात करतो. त्यानंतर रिया हसत-हसतच तेथून पळ काढते.  हा व्हिडिओ केनियामधील असल्याचं बोललं जात आहे.

 
 
 
 

A post shared by (riyasendv) on

सध्या रिया वेब शोमध्ये भूमिका साकारताना दिसते. रिया 2 वर्षांपूर्वी बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत लग्नबंधनात अडकली. 'कयामत', 'झंकार बीट्स', 'स्टाइल', 'दिल विल प्यार व्यार', 'तेरे मेरे फेरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये रियाने भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय काही बंगाली चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.