असंख्य चाहत्यांपुढे कार्तिकने सारासोबत असं काही केलं की....

एकदा हा व्हिडिओ पाहाच... 

Updated: Feb 6, 2020, 06:58 PM IST
असंख्य चाहत्यांपुढे कार्तिकने सारासोबत असं काही केलं की....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

अहमदाबाद : अभिनेता कार्तिक आर्यन  kartik aaryan आणि अभिनेत्री सारा अली खान sara ali khan  ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्य़ाआधीच त्यांची लोकप्रियता ही शिखरावर पोहोचली आहे. कलाविश्वातील हे दोन्ही नवे चेहरे त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. 

येत्या काळात ही जोडी इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या काही दिवसांतच त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यानिमित्ताने सारा आणि कार्तिक सध्या विविध कार्यक्रमांमध्ये जाऊन चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत. अशाच एका कार्यक्रमादरम्यान, या दोघांचा धमाल अंदाज पाहायला मिळाला. 

अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात असंख्य चाहत्यांसमोर ही जोडी नृत्य सादर करत होती. 'हाँ मै गलत', अशा गाण्यावर नृत्य करत असतानाच त्यादरम्यान साराला कल्पनाही नसताना कार्तिकने उचलून घेतलं. काहीच अंदाज नसताना कार्तिकचा हा अंदाज सारालाही तितकाच नवा होता, जितका तो चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा होता. 

 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सोशल मीडियावर अतिशय चर्चेत असणारा हा व्हि़डिओ खुद्द कार्तिकनेही शेअर केला आहे. ज्यामध्ये हे दोन्ही सेलिब्रिटी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'लव्ह आज कल' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर या नव्या जोडीच्या केमिस्ट्रीची एक झलक चाहत्यांना पाहता आली. आता त्यांचा चित्रपटही अशाच प्रकारची कामगिरी करत सारा आणि कार्तिकला यश मिळवून देतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.