खास व्यक्तींसोबत सैफच्या लेकीचं दिवाळी सेलिब्रेशन

पाहा या खास क्षणांचे तितकेच खास फोटो 

Updated: Oct 27, 2019, 12:21 PM IST
खास व्यक्तींसोबत सैफच्या लेकीचं दिवाळी सेलिब्रेशन

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळीही या आंददायी माहोलामध्ये धनाल करत आहेत. मित्रमंडळींच्या, कुटुंबीयांच्या आणि काही खास मित्रांच्या सहाय्याने ही सर्व मंडळी दिवाळीचा आनंद लुटत आहेत. यामध्येच अभिनेत्री सारा अली खान हिचाही समावेश आहे. साराने यंदाच्या दिवाळीची सुरुवात काही खास व्यक्तींसोबत केली आहे. 

ही खास मंडळी आहेत, साराचे वडील अभिनेता सैफ अली खान, करिना कपूर खान, भाऊ ईब्राहिम आणि तैमूर. आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या साराने काही खास क्षण कुटुंबीयांसमवेत व्यतीत केला आहे. खुद्द सारानेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

'दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ', असं कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये सारा, करिना आणि सैफ अली खान पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. 'स्टार स्टडेड' अशा या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधत आहे ते म्हणजे तैमूर आणि ईब्राहिम. सैफची ही दोन्ही मुलं, सोशल मीडियावर सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. 

गेल्या काही काळापासून सारा ही बॉलिवूडमधील आघा़डीच्या अभिनेत्रींपैकी एक ठरत आहे. 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी सारा येत्या काळातही काही दमदार चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.