Pornography Case : पतीच्या करामतींबाबत शिल्पा शेट्टीकडून पोलिसांत धक्कादायक जबाब

तो आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.   

Updated: Sep 17, 2021, 08:53 AM IST
Pornography Case : पतीच्या करामतींबाबत शिल्पा शेट्टीकडून पोलिसांत धक्कादायक जबाब
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) मागील काही दिवसांपासून बऱ्याच अडचणींचा सामना करताना दिसत आहेत. अश्लील व्हिडीओ प्रकरणात नाव गोवलं गेल्यामुळे शिल्पाचा पती, राज कुंद्रा यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दर दिवसागणिक त्याच्या अडचणीच वाढत आहेत. त्यातच आता त्याची पत्नी, शिल्पा शेट्टी हिनं पोलिसांना दिलेल्या जबाबामुळंही तो आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

अडल्ट फिल्म, अश्लील व्हिडीओप्रकरणी आपला जबाब नोंदवताना पती, राज कुंद्रा नेमकं काय करु इच्छित होता याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं शिल्पानं उघड केलं. 

मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणी एक सप्लीमेट्री चार्जशीट दाखल केली आहे. यामध्येच शिल्पाचा जबाबही नोंदवला गेला आहे. मी आपल्याच कामात व्यग्र होते. त्यामुळे पती राज कुंद्रा अश्लील व्हिडीओप्रकरणी नेमकं काय करत होता याची मला कल्पनाच नाही, काहीच ठाऊक नाही असं तिनं या जबाबाबत नमूद केलं. 

राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणात शिल्पा शेट्टीविरोधात इतर 43 साक्षीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही एक 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट आहे. मुंबई पोलिसांकडून ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. राज कुंद्राला या प्रकरणात दोषी आढळल्यामुळं मुंबई गुन्हे शाखेनं सदर प्रकरणी कुंद्रासोबतच वियान इंडस्ट्रीजचे आयटी हेड रायन तोर्पेविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. 

19 जुलैपासून राज कुंद्रा आणि त्याच्यासह 11 इतर लोकांना अटक करण्यात आली आहे. शिल्पाकडून सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, '2015 मध्ये राज कुंद्रानं वियान इंडस्ट्री सुरु केली होती. 2020 पर्यंत मी स्वत: कंपनीच्या संचालकपदी होते. ज्यानंतर काही व्यक्तीगत कारणांनी मी या पदाचा त्याग केला होता. मला ठाऊकच नाही, की हॉटशॉट किंवा बॉलिफेब हे अॅप कोणत्या उद्देशानं काम करतात हे मला ठाऊक नाही, मी तर माझ्या कामांमध्ये व्यग्र होते. त्यामुळे राज कुंद्राच्या कामाच्या बाबतीत काही माहिती नाही'. 

राज कुंद्रावर सदर प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, न्यायालयानं त्याला अद्यापही जामीन मंजूर केलेला नाही. यापूर्वीही कुंद्रा काही वादांमध्ये अडडकला होता. पतीला जामीन मिळत नसल्यामुळं शिल्पा शेट्टीवरही याचे थेट परिणाम झाले होते. पण, पुन्हा एकदा तिच्या आयुष्यानं वेग पकडण्यास सुरुवात केली.