श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी...

बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 04:11 PM IST
श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी...

मुंबई : बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी. १९ व्या शतकापासून ते अगदी २१ व्या शतकापर्यंत तिच्या सौंदर्याची जादू अजूनही कमी झालेली नाही. वय वाढले असले तरी तिचे सौंदर्य तरुण आहे. तिचा फॅशनेबल लूक आणि स्टाईल यामुळे तिने तिचे वेगळेपण टिकवून ठेवले. 

श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी

तिच्या सौंदर्याची भूरळ अनेकांना पडते. तिच्यासारखे दिसावे-असावे, असे अनेक तरुणींना वाटत असेल. पण काय माहित कदाचित श्रीदेवीला अजून सुंदर दिसण्याचा मोह आवरता आला नसेल म्हणून तिने काही दिवसांपूर्वी ओठांची सर्जरी केली.

फोटोज व्हायरल

चित्रपट निर्माते अनुराग बसु यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी सरस्वती पूजेचे आयोजन केले होते. तिथे श्रीदेवी पती बोनी कपूर यांच्यासह पोहचली. यावेळेस तिच्या ओठातील फरक प्रथम दिसून आला. त्यावेळेस तिचे ओठ पूर्वीपेक्षा अधिक सुजलेले दिसले. त्यानंतर इंडियाज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डमध्ये श्रीदेवी दिसली. तेव्हाही ओठातील फरक जाणवत होता. या पुरस्कार सोहळ्यातील फोटोज तर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर श्रीदेवीने ओठांची सर्जरी केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. 

 

Wearing @sabyasachiofficial and Jewelry by @shriharidiagems

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

ड्रेस, स्टाईलपेक्षा ओठांवर सर्वांचे लक्ष

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत श्रीदेवीच्या ओठांचा शेप बिघडलेला दिसत आहे. सध्या श्रीदेवीच्या ड्रेस, स्टाईलपेक्षा ओठांवर सर्वांचे लक्ष जात आहे. मात्र खरंच ही सर्जरी झाली आहे की नाही, याबद्दल श्रीदेवीने कोणताही खुलासा केलेला नाही. 

 

Wearing my favourite @manishmalhotra05 Jewellery by @gemsjewelspalace

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on