close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : नवा मेकओव्हर पाहून सोनाली भावूक

कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सोनालीचा मेकओव्हर 

Updated: May 30, 2019, 08:08 AM IST
VIDEO : नवा मेकओव्हर पाहून सोनाली भावूक
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं एक वेगळं आणि नवं रुप गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं. या आजाराचं निदान झाल्यापासून त्यावरील उपचार होईपर्यंत प्रत्येक वेळी सोनालीने परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिलं. तिचा धीटपणा पाहून तर, कॅन्सरनेही हात टेकले. 

कोणा एका व्यक्तीला खचवून टाकणाऱ्या या आजारावर मात करणारी सोनाली आता पूर्णपणे सावरली आहे. मुख्य म्हणजे ती पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे, तेही एका नव्या रुपात. सोनालीने सोशल मीडियावर याविषयीची पोस्टही शेअर केली. ज्यामध्ये ती नव्या हेअरकटसाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

तोमोहिरो हा तिच्या या नव्या लूकमागचा कलाकार आहे हेसुद्धा तिच्या पोस्टमधून कळत आहे. कारण, त्याच्यासोबतचाही फोटो तिने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली काही क्षणांना भावूकही झालेल्याचं पाहता येत आहे. आनंद, वेदना, समाधान असे संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे झळकत आहेत. 

सोनालीच्या नवनवीन हेअरस्टाईलसाठी ज्या व्यक्तीला श्रेय दिलं पाहिजे तोच हा चेहरा. सोनाली आणि तोमोहिरो यांच्यातील मैत्रीचं नातंही इतकं खास आहे की, भारतात सुट्टीसाठी आलेल्या सोनालीच्या या खास मित्राने पुन्हा एकदा तिला नवा लूक देत चेहऱ्यावर हसू आणलं. 

सोनालीचा हा लूक पाहता ही मराठमोळी बॉलिवूड दिवा जीवनाचा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाली आहे, असंच म्हणावं लागेल. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सोनालीने तिच्यात होणारे मानसिक आणि शारीरिक असे सर्वच बदल चाहत्यांसमोर ठेवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा प्रवास सर्वांपर्यंत पोहचवला. मुळात असे आजार उदभवल्यानंतर खचणाऱ्या, आत्मविश्वास गमावून बसणाऱ्या अनेकांसाठीच तिने जगण्याची नवी उमेद आणि आयुष्याकडे पाहण्याता नवा दृष्टीकोन दिला.